💥परभणीत जम्मु-काश्मिर मधील हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी केली जोरदार निदर्शने...!


💥जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आली जोरदार निदर्शने💥 

परभणी (दि.०९ आक्टोंबर) : जम्मु-काश्मीरमध्ये हिंदूंवर सातत्याने होणारे अत्याचार व हिंदुच्या होणाऱ्या निर्घृण हत्यांच्या गंभीर घटनांच्या निषेधार्थ विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती,दुर्गा वाहिनी तसेच अन्य समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने आज शनिवार दि.०९ आक्टोंबर २०२१ रोजी दूपारी ०३-०० वाजेच्या सुमारास येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

विश्‍व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांतमंत्री प्राचार्य अनंत पांडे,भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ज्येष्ठ नेते रामकिशन रौंदळे, अ‍ॅड. किरण दैठणकर, श्रीनिवास मुंदडा, समीर दुधगांवकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव कानडे, सुरेंद्र शहाणे, शिवप्रसाद कोरे, सुनील रामपुरीकर, गोपाळ रोडे, अभिजित कुलकर्णी, राजकुमार भांबरे, सचिन जोशी, आशिष चिटणीस, रितेश जैन, संजय रिझवानी,सुभाष जावळे, एन.डी. देशमुख, मंदार कुलकर्णी विनोद लोलगे, श्रीपाद कुलकर्णी, स्वप्नील पुरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मातृ शक्ती च्या श्रीमती द्रौपदी गायकवाड या आंदोलनात सहभागी होते.

      काश्मीरमध्ये अत्याचार वगैरे प्रकार चालू असताना हिंदू हा या विषयावर गप्प आहे, असे मत व्यक्त करीत विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी या विषयाला वाचा फोडण्यासाठी, शासन व प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी मोठे आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा दिला. तसेच काश्मिर भागातील हे प्रकार सरकारने तात्काळ न थांबविल्यास त्या गोष्टीचा मोठा विपरित परिणाम देशभरात होईल, अशीही भिती व्यक्त केली. यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या