💥चिखलीच्या नगराध्यक्षा सौ.प्रियाताई बोंद्रे व मा.उपाध्यक्ष कुणाल बोंद्रे आपल्या समर्थकांसह घेणार आज काँग्रेस पक्षात प्रवेश...!💥राज्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा महिला व बालकल्याण मंत्री ना.यशोमतीजी ठाकुर यांची विशेष उपस्थिती💥

✍️ मोहन चौकेकर

चिखली : राज्यातील काँग्रेस पक्षाच्या नेत्या तथा महिला बालकल्याण मंत्री नामदार यशोमतीजी ठाकुर यांच्या विशेष उपस्थितीत बुलडाणा जिल्हा काॅगेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवुन चिखलीच्या नगराध्यक्षा सौ.प्रियाताई बोंद्रे हया आपले पती कुणाल बोंद्रे व समर्थकासह आज काॅगेस पक्षात जाहीर प्रवेश करीत आहेत.


सन 2016 च्या नगर परिषद निवडणुकीत थेट जनतेतून चिखलीच्या नगराध्यक्ष पदी विराजमान झालेल्या सौ. प्रियाताई कुणाल बोंद्रे, त्यांचे पती न.प.चे माजी उपनगराध्यक्ष कुणाल बोंद्रे तथा कुणाल बोंद्रे यांचे खंदे समर्थक चिखली नगर परिषदेचे विद्यमान पाणीपुरवठा सभापती गोपाल देव्हडे, व अमडापुर जिल्हा परिषदेच्या सदस्या   सौ. शैलाताई श्याम पठाडे व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह आज भारतीय राष्ट्रीय काॅगेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश घेत आहेत. या काॅगेस प्रवेश सोहळयाचे आयोजन आज दिनांक 28 आॅक्टोंबर रोजी सकाळी 10 वाजता, चिखली येथील जयस्तंभ चैक परीसरात करण्यात आले आहे. या प्रवेश सोहळया प्रसंगी  प्रदेश उपाध्यक्ष अॅड.गणेशराव पाटील, प्रदेश सरचिटणीस श्यामभाउ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आमदार राजेश एकडे, माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा,जिल्हा परिषद अध्यक्षा   सौ. मनिषाताई पवार, जि.प. महिला व बालकल्याण सभापती सौ. ज्योतीताई पडघान यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या भव्य पक्ष प्रवेश प्रवेश सोहळयास चिखली विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच नागरीकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चिखली तालुका व शहर काॅगेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या