💥पाथरीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढी विरोधात तीव्र निदर्शने....!


💥तहसिलदारांना निवेदन देऊन नोदवला पेट्रोल डिझेल व घरगुती गॅस दरवाढीचा निषेध💥


 ✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-दोन वर्षां पासून देशातील नागरीक कोरोना मुळे आर्थिक चणचणीत सापडल्या मुळे त्याला दिलासा देण्याची गरज असताना केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस ची आवाक्याच्या बाहेर किंमत केली आहे.त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात जनतेमध्ये रोष आहे.सबका साथ सबका विकास म्हणना-या केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पाथरी तालुका शाखेच्या वतीने महागाई विशेषतः पेट्रोल डिझेल, घरगुती गॅस दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकारच्या विरोधात  मंगळवार २० ऑक्टोबर रोजी तिव्र निदर्शने करण्यात आले.


केंद्र शासना विरोधात हे आंदोलन राकाँचे प्रदेशाध्यक्ष ना जयवंत पाटील यांच्या मार्गदर्शनात संपुर्ण राज्य भर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रेदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्या नेतृत्वात करण्यात आले पाथरीत जिल्हाध्यक्ष आ बाबाजानी दुर्रानी यांच्या मार्गदर्शनात रायुकाँच्या वतीने सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी भवन ते सेलू काॅर्णर वरील छत्रपती शिवराय चौक ते तहसिल कार्यालया पर्यंत हातात राकाँचे झेंडे घेत केंद्र सरकार विरोधात निषेधाच्या घोषणा देत निदर्शने केली. या वेळी तहसिल कार्यालया समोर निदर्शक आले असता या ठिकाणी जि प चे माजी शिक्षण आणि आरोग्य सभापती दादासाहेब टेंगसे रायुकाँचे शहरध्यक्ष शेख खालेद,गंगाधर डूकरे यांनी पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात केंद्र सरकार वर हल्लाबोल केला या नंतर निषेधाचे निवेदन लहसिलदारांना दिले.

या आंदोलनात जि पचे माजी शिक्षण आणि आरोग्य  सभापती दादासाहेब टेंगसे नगराध्यक्ष नितेश भोरे, नगरसेवक अजय सिंग पाथ्रीकर, नसीर तात्या, युसुफुदिन अन्सारी, गोविंद हरकळ, इरफान सेठ,सतीश वाकडे, राजीव पामे, राष्ट्रवादीचे युवक चे तालुकाध्यक्ष विष्णू काळे, शहराध्यक्ष शेख खालेद, रायुकाँचे तालुका कार्याध्यक्ष शुभम टाकळकर, राकाँचे शहराध्यक्ष सुनील उन्हाळे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष अहमद आतार,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कार्तिक घुंबरे, शहराध्यक्ष अमोल भाले, मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भदर्गे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप टेंगसे, शेख अजहर,दीपक गवारे हर्षवर्धन ढवळे, कमलाकर ढवळे, युवराज आतकरे, दत्ता चिकणे, मुस्तफा अन्सारी, आसिफ अन्सारी, पंचायत समिती सदस्य राधाकिशन डुकरे, अजय थोरे, सरपंच अश्फाक खान, मोईज अन्सारी, दादाराव गवारे,  सुनील पितळे, अतुल जती, मधुकर काळे, तुकाराम तिखे, गंगाधर डुकरे, दिलीप धरपडे, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या