💥पुर्णेत महाविकास आघाडीकडून लखीमपूर शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला समिश्र प्रतिसाद...!


💥शहरात महाविकास आघाडीकडून लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ रैली काढून तहसिलदारांना देण्यात आले निवेदन💥


पुर्णा (दि.११ आक्टोंबर) - उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे शांततेत निदर्शन करीत असलेल्या शेतकऱ्यांवर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याने स्वतःच्या ताफ्यातील गाड्या घालून शेतकऱ्यांचे हत्याकांड घडवून आणले या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवार दि.११ आक्टोंबर रोजी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते या अनुषंगाने पुर्णेतही महाविकास आघाडीचे वतीने बदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटने विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शहरात रैली काढून तहसीलदार पल्लवी टेमकर यांना निवेदन देण्यात आले या वेळी शिवसेना नेते तथा पुर्णा नगर परिषद नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी माजी नगरसेवक संतोष एकलारे,काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष वहीद कुरैशी,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ.संजय लोलगे,राष्ट्रवादी काँग्रेस नेते अखील अहैमद ,शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजाभाऊ कदम,काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगरसेवक तथा जिल्हा सरचिटणीस शंकर पुंडगे,तालुका उपाध्यक्ष प्रक्षित सवनकर,बालाजी कदम,माजी नगरसेवक तथा जेष्ठ नेते अब्दुल सलीम,युवा सेना शहर प्रमुख विकास वैजवाडे,काँग्रेस तालुका राजु गायकवाड,युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल डाखोरे,आनंद ठाकूर,चंपतराव , प्रल्हाद पारवे,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या