💥मौजे कोकलगाव येथे घरोघरी जावून केले लसिकरण,आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांचा पुढाकार....!


💥‘मिशन कवच कुंडल’ मोहिमेतंर्गत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे ; कुटूंबातील गृहिणींच्या लसीकरणासाठी दक्षता घ्यावी💥

 ✍🏻फुलचंद भगत

वाशिम:- जिल्ह्यात कोरोनाची दूसरी लाट कमी होत असली तरी जिल्हा प्रशासन सजग असुन कोरोना हद्दपार होऊन संभाव्य तिसरी लाट येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. कोरोनाला पुर्णत: हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यात दि.8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन प्रशासनाकडुन करण्यात आले होते.मौजे कोकलगाव येथे आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांच्या पुढाकारातुन घरोघरी जावून लसिकरण करुन मार्गदर्शनही केले.

            जिल्हा प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव पुर्णत: रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून या उपाययोजना यशस्वी देखील होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी संभाव्य तिसरी लाट येऊ नये याकरीता सर्वांनी लसीकरण करुन घेणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी दि. 8 ते 14 ऑक्टोबर, 2021 या कालावधीत ‘मिशन कवच कुंडल’ ही विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस जिल्ह्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, अनेक नागरिकांनी लसीकरण करुन घेतले आहे. परंतू घरकाम किंवा कुटूंबाच्या जबाबदारीमुळे कुटूंबातील प्रमुख गृहीणी या लसीकरणांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. याकरीता कुटुंब प्रमुखांनी कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत गृहीणींचे देखील लसीकरण होईल व त्या सर्व सुरक्षित होतील याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व ग्रामिण क्षेत्रात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी 8 ऑक्टोबरपासून विशेष लसीकरण मोहिमेअंतर्गत राबविण्यात येत असून यासाठी सर्व नगरपालिकेअंतर्गत प्रभागनिहाय लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. लसीकरण केंद्रावर लोकांना मदत करण्यासाठी तसेच लोकांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी नगरपालिका कर्मचारी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची संयुक्त पथके स्थापन करण्यात आली आहेत. यात लसीकरणासाठी लोकप्रतिनिधी, नगराध्यक्ष व नगरसेवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे. तरी  ‘मिशन कवच कुंडल’ लसीकरण अभियानाअंतर्गत नागरी भागातील सर्व नागरिकांनी आपल्या कुटूंबातील सर्व सदस्यांचे लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.मौजे कोकलगाव येथे आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी पथकासह घरोघरी भेट देवून लसिकरणाचे महत्व पटवून दिले आणी लसिकरणही केले.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या