💥धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन व वर्षावास समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्या संदर्भात बैठकीचे आयोजन...!


💥भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन💥 

पूर्णा : येथील बुद्ध विहार या ठिकाणी दि.4 आक्टोंबर रोजी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली भदंत पय्या वंश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 4.10.2021 रोज सोमवार वेळ सायंकाळी सहा वाजता बुद्ध विहार पूर्णा याठिकाणी महत्व पूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी साजरा करावयाचा आहे. तसेच  20 .10 .2021रोजी अश्विन पौर्णिमेला वर्षावास समारोप संघ दान कार्यक्रमाचे बुद्ध विहार या ठिकाणी आयोजन करण्यात येणार आहे. त्यासंबंधी विचारविनिमय करून कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला वेळेवर उपस्थित राहावे सहकार्य करावे असे आव्हान बोधिसत्व बी आर आंबेडकर स्मारकव बुद्धविहार समितीचे सचिव एडवोकेट महेंद्र गायकवाड समितीचे सर्व सदस्य व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णा यांच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या