💥खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून महिला उद्योजकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणार - जरीना देशमुख


💥खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या जनजागृती शिबीरासाठी लोकसेवा सामाजिक संस्थेचा पुढाकार💥

अंबाजोगाई (प्रतिनिधी) - खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला उद्योजकांसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या जरीना देशमुख यांनी केले.त्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या जनजागृती शिबीरात बोलत होत्या,जनजागृतीपर  शिबीराच्या आयोजनासाठी लोकसेवा सामाजिक संस्थेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.

भारत सरकारचे खादी आणि ग्रामोद्योग आयोग सूक्ष्म,लघु एवं मध्यम उद्यम मंत्रालय आणि लोकसेवा सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने तसेच खादी आणि ग्रामोद्योग आयोग (केव्हीआयसी) राज्य कार्यालय,महाराष्ट्र यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच हज हाऊस,सी.एस.टी.,मुंबई या ठिकाणी खादी और ग्रामोद्योग आयोग प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (पीएमईजीपी) योजनेच्या अंतर्गत जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.शिबीराचा "विषय : महिला उद्योजकांसाठी रोजगार संधी" हा होता.यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार तथा मौलाना आझाद विचारमंचचे अध्यक्ष हुसेन दलवाई,भारत सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग आयोग,एमएसएमई मंत्रालयाचे मुख्यकार्यकारी अधिकारी वाय.के.बारामतीकर,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (वेस्ट झोन) संजय हेडाओ,महाराष्ट्राचे संचालक मनीष मोहन कांबळे,माजी संचालक प्रज्ञा जोगळेकर आणि लोकसेवा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.याप्रसंगी सर्वच मान्यवरांनी स्टार्ट-अप चळवळीत महिलांच्या सहभागाची गरज अधोरेखित केली.तर या शिबिरात बोलताना लोकसेवा सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा जरीना देशमुख म्हणाल्या की,आमची संस्था ही महिला सक्षमीकरण,महिलांना शिक्षण,बेटी बचाव,स्वच्छता,पर्यावरण जनजागृती, महिला बचत गट या सहीत मुलांच्या मोफत शिक्षणासाठी,खादी ग्रामोद्योग आदींसह विविध विषयांवर कार्य करते तसेच खादी ग्रामोद्योगात गेल्या सात वर्षांतले महत्त्वाचे यश म्हणजे सोलर चरख्याचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होय.विशेषत: ग्रामीण रोजगार निर्मितीच्या क्षेत्रात मोठी भूमिका बजावणाऱ्या या उपक्रमाने उचललेली नवनवी पावले विशेष नोंद घेण्याजोगी आहेत.ग्रामीण कारागिराच्या ऊर्जितावस्थेचे एक व्यापक लक्ष्य समोर ठेवून नव्या टीमने काम सुरू केले. कारीगरी-रोजगार-उत्पादन-पणन आणि त्यातून आर्थिक सबलीकरण अशी एक शृंखला नव्याने आणि आणखी परिणामकारकरीत्या स्थापित व्हावी यासाठी खादी-ग्रामोआयोगाची टीम परिश्रमपूर्वक काही करू पाहात आहे. खादी भांडारांना सरकारीकरणाच्या चौकटीतून बाहेर काढून आधुनिक बाजार-व्यवस्थेशी जोडण्याचे प्रयत्नही कमालीचे यशस्वी झाले आहेत.खादी- ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी नवी हजारो विक्री केंद्रे उघडण्यात आली आहेत,राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, एनजीओ वर्तुळातील मंडळी आणि मुख्यत्वे गांधी विचारनिष्ठांपुरता मर्यादित असलेला खादीच्या वापरकर्त्यांचा परीघ विस्तारावा यासाठी कल्पकतेने,जाणीवपूर्वकतेने अनेक प्रयत्न सुरू झाले आहेत.केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने सोलर- चरखा मिशन हाती घेतले असून त्यातून देशभरातील पारंपरिक वस्त्रोद्योग कारागिरीला प्रोत्साहन मिळेल आणि नवे रोजगारही निर्माण होतील.खादी-ग्रामोद्योगाचा सामाजिक पैलूही महत्त्वाचा आहे.विणकर,कुंभार, रंगारी,सुतार अशा नानाविध समाजगट व महिला बचत गटांना खादी-ग्रामोद्योगाने आधार दिल्याची अगणित उदाहरणे आहेत.खादी-ग्रामोद्योगाचे असे अनेक पैलू आहेत जे शेतकऱ्यांना,महिलांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. 'सुत कताई' हे त्याचेच एक उदाहरण ! यातून अनेक ग्रामीण महिला व तरूणांना रोजगारही मिळाला व देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यातही भर पडली.ग्रामीण रोजगार विकासाला चालना देत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचा विचार हा गांधी मार्गानेच पुढे नेता येईल हे या आयोगाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.आम्ही महिला सक्षमीकरणासाठी कार्य करीत आहोत, अंबाजोगाई,परळी वेस आणि घाटनांदुर येथे खादी उत्पादन करीत आहोत.१५०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा संकल्प आहे. खादी भवन सुरू करायचे आहे.दिव्यांग बांधवांना खादी ग्रामोद्योगाच्या माध्यमातून प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणार आहोत असे सामाजिक कार्यकर्त्या जरीना देशमुख म्हणाल्या. अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातून मुंबई सारख्या मोठ्या शहरात खादी ग्रामोद्योग या संदर्भाने महिलांसाठी जनजागृतीपर शिबीर आयोजित करून सामाजिक कार्यकर्त्या जरीना देशमुख यांनी बीड जिल्ह्याचे नांव महिला सबलीकरण व आर्थिक सक्षमीकरण या क्षेत्रात उंचावले ही अभिनंदनीय बाब आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या