💥पुर्णेतील स्मशानभुमीत बोगस सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम ; स्वच्छालयाचा वापर आता मृतात्मेही करणार काय...?

 


💥दलित वस्ती सुधार योजनेतील करोडो रुपयांच्या निधीचा गैरवापर तात्काळ चौकशी करण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी💥


पुर्णा (दि.१३ आक्टोंबर) - 'जगात जर्मनी,भारतात परभणी परभणीत पुरणा अन् इथ भ्रष्टाचाऱ्यांना गिळाया कायभी उरना' अशी अवस्था पुर्णेची झाली असून अनावश्यक ठिकाणी शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेतील कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीतून महाराष्ट्र नगर परिषदा औद्योगिक वनागरी अधिनियम १९६५ व महाराष्ट्र लेखा संहिता २०१३ मधील तरतुदीला तिलांजली देऊन शासनाने निर्गमीत केलेल्या शासन निर्णय क्रमांक टिएफसी.८०८५/प्र.क्र.१०६/नवि-४ दि.०३-०८-२०१५,२९-०४-२०१७ च्या शासन निर्णयान्वये ठरवून दिलेल्या मार्गदर्शक निकषानुसार सुचना/अटी व शर्तीचे बेजवाबदारपणे उल्लंघन करून बांधकामे अंदाजपत्रकातील विशिष्ट मापदंडानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाची विकासकामे करून शासकीय विकासनिधी गिळकृत करण्याचा उद्योग नगर परिषद प्रशासनातील जवाबदार अधिकारी असलेल्या मुख्याधिकारी लोकप्रतिनिधी आणि गुत्तेदारांनी चालवल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून शासनाने शहरातील दलित वसाहतींच्या विकासासाठी मंजूर केलेला कोट्यावधी रुपयांचा दलित वस्ती सुधार योजनेतील निधी अनावश्यक ठिकाणी बोगस विकासकाम करून गिळकृत केल्या जात आहे.

-----------------------------------------------------------------------

💥पुर्णा नगर परिषद प्रशासनाचा अजब गजब कारभार ; चक्क स्मशानभुमीतच उभारले सार्वजनिक बोगस शौचालय ?

💥स्मशानभुमीतील स्वच्छालयांचा कोण करणार वापर💥


भ्रष्ट अधिकारी तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी आणि भ्रष्ट बेईमान गुत्तेदारांच्या संगणमतातून दलित वस्ती सुधार योजनेतील शासकीय विकासनिधीची किती सुनियोजित पध्दतीने विल्हेवाट लावल्या जात आहे याचे उदाहरण जर बघायचे असेल तर पुर्णा नदी काठावरील बौध्द स्मशानभुमीत दलित वस्ती सुधार योजनेतून ५१ लाख १६ हजार ६०० रुपयांच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या स्त्री/पुरुष बोगस स्वच्छालय व पेवर ब्लाकचे काम पाहावे लागेल पेवर ब्लाक व अन्य सुविधांचे सोडा परंतु या ठिकाणी स्वच्छालयाची आवश्यकता तरी आहे का ? असा प्रश्न निश्चितच उपस्थित होईल मनुष्य वसाहत असलेल्या अनेक भागातील स्वच्छालयांचा वापर होत नसल्याने त्यांचे रुपांतर खंडरांमध्ये झाले आहे मग स्मशानभुमीतील स्वच्छालय कशासाठी ? अन् तिही बोगस असा प्रश्न जनसामान्यांत उपस्थित होत आहे

---------------------------------------------------------------------------


शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील बौद्ध स्मशान भुमी/दफन भुमीत स्त्री व पुरुषांसाठी शौचालय आणि पेवर ब्लाकचे बांधकाम ज्याचे अंदाजपत्रक ५१ लाख १६ हजार आठशें रुपये तर प्रभाग क्रमांक ७ मधील हरिनगर येथे डॉ.आंबेडकर हॉल परिसरात पेवर ब्लॉक बांधकाम ५१ लाख ९१ हजार रुपयें,प्रभाग क्रमांक ७ मधील पंचशील नगर येथे सि.सी. रोड व आर.सि.सी.नाली बांधकाम २८ लाख ३६ हजार १०० रुपये,प्रभाग क्रमांक ७ मधील हरिनगर येथे आर.सि.सी.नालीचे बांधकाम ६ लाख १३ हजार ८०० रुपये,प्रभाग क्रमांक ९ मधील कुषी नगर येथील महेंद्र ढगे यांचे घर ते मोगले यांच्या घरा पर्यंत सि.सी.रोडचे बांधकाम २० लाख ६०० रुपये,प्रभाग क्रमांक १० मधील फुले नगर येथील पंडीत यांचे घर ते इ.एस.आर पर्यत या आवश्यकता नसलेल्या ठिकाणी सि.सी.रोडचे बांधकाम १९ लाख ८७ हजार ७०० रुपयें अश्या प्रकारे दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीचा गैरवापर करून शहरातील विविध भागात बोगस विकासकाम करण्यात येत असल्यामुळे या बोगस विकास कामांची तात्काळ चौकशी करावी व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख अनवर शेख महेमुद यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे दि.११ आक्टोंबर २०२१ रोजी केली असून निवेदनात असे म्हटले आहे की या कोट्यावधीच्या बोगस कामांमध्ये नगर परिषद मुख्याधिकारी तसेच नगर अभियंते यांनी गुत्तेदारांशी संगनमत करून तंत्रशुध्द पध्दतीने केलेल्या गैरकारभाराची चौकशी करावी व तत्पुर्वी संबंधित अधिकाऱ्यांचे बडतर्फीचे आदेश निगमित करावे सदर प्रकरणी त्वरीत कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालया समोर दि.२७ आक्टोंबर २०२१ रोजी आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला असून या निवेदनाच्या प्रतिलिपी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे,नगर पालिका प्रशासन महाराष्ट्र राज्य वरळी मुंबई,लोकपाल आयुक्त मुंबई यांना सुध्दा पाठवण्यात आल्या असून निवेदनावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष शेख अनवर शेख महेमुद यांची दुसऱ्या एका निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते राज नारायनकर यांची स्वाक्षरी आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या