💥नांदेड येथील सिख समाजाने केला उत्तर प्रदेशातील लखीमपुर खिरी हत्याकांडाचा निषेध...!


💥केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्र यांना मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टीची पंतप्रधानांकडे निवेदनाद्वारे मागणी💥



नांदेड (दि.०५ आक्टोंबर) - उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खिरी या गावात दि.०३ आक्टोंबर २०२१ रोजी केद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्र यांचा मुलगा आशिष मिश्र या नराधमाने आदोलनकारी शेतकऱ्यांना कार घालून चिरडून मारल्याची मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली या घटनेचा नांदेड येथील सिख समाजाच्या वतीने आज ०५ आक्टोंबर २०२१ रोजी तिव्र शब्दात निषेध करीत जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन पाठवण्यात आले.


नांदेड येथील सिख समाजाच्या वतीने लखीमपुर घटनेच्या निषेधार्थ पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की निरपराध आंदोलनकारी शेतकऱ्यांना स्वतःच्या ताफ्यातील वाहनांखाली चिरडून त्यांची निर्घृण हत्या एका जवाबदार केंद्रीय गृहराज्य मंत्र्याच्या मुलाकडून करण्याची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेचा आम्ही निषेध करीत आहोत या घटनेतील दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्र यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशीही निवेदनात मागणी करण्यात आली असून आंदोलन कारी शेतकऱ्यांच्या मागणीवर तात्काळ तोडगा काढून  आंदोलन थांबवण्याच्या दिशेने पावल उचलण्यात यावी अशीही निवेदनात मागणी करण्यात आली असून या निवेदनावर सरदार अवतारसिंघ पहरेदार,सरदार तेजपालसिंघ खेड,सरदार प्रितपालसिंघ शाहू,सरदार रणजीतसिंघ मनन,सरदार मनप्रीतसिंघ कारागीर,सरदार सर्दुलसिंघ कोटतिर्थवाले,सरदार प्रेमज्योतसिंघ लांगरी,सरदार जयदेवसिंघ हुजुरीया आदींच्या स्वाक्षरी आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या