💥परभणी जिल्ह्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित प्रश्नावर राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी मुंबईत घेतली आढावा बैठक....!


💥जलसंपदा मंत्र्यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली💥

परभणी - जिल्हयातील जलसंपदा विभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व विभागाची आढावा बैठक घेऊन जिल्हयातील सिंचन विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मा.ना. बच्चुभाऊ कडू जलसंपदा राज्यमंत्री यांच्याकडे विनंती केली होती याच विनंती पत्रानुसार दि. २६.१०.२०२१ रोजी मा.ना. बच्चुभाऊ कडु राज्यमंत्री जलसंपदा विभाग यांनी मंत्रालयातील त्यांच्या दालनामध्ये जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा करण्यात आली व संबंधीत प्रश्न मार्गी लावण्याबाबत अधिकान्यांना सूचना देण्यात आल्या.

*१. परभणी जिल्हयातील जलसंपदा विभागातील २००० रिक्त पदांची भरती.*

*२. गोदावरी नदीवरील मुळी बंधाऱ्याचे गेट जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागामार्फत बसविणे.*

*३. परभणी तालुक्यातील सावंगी ( खुर्द ) येथील करपरा नदीवर जलसंपदा विभागामार्फत पुलाचे बांधकाम करणे.*

*४.पैठण डाव्या कालव्यातील गाळ यांत्रिकी विभागामार्फत काढणे.*

*५. तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री. सलगरकर, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ परभणी यांच्या हलगर्जीपणामुळे वाया गेलेल्या ८०.७२ दलघमि पाण्याची वसुली संबंधीत अधिकान्याकडून करणे.*

*६.  तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री. सलगरकर, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र. २ परभणी यांनी परभणी महानगरपालिकेच्या वतीने कालव्यावर पुलाचे बांधकाम करण्यासाठी चुकीची एनओसी दिल्याने परिसरातील नागरीकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले होते. या प्रकरणाची चौकशी करणे.*

*७. तत्कालीन कार्यकारी अभियंता श्री.अंभोरे, जायकवाडी पाटबंधारे विभाग क्र.२ परभणी यांनी शासनाची परवानगी न घेता परस्पर विकलेल्या भंगार वाहने, भंगार मशनरी व लोखंडी भंगार साहित्य विक्रीची चौकशी करून कार्यवाही करणे.*

*८. परभणी जिल्हयामध्ये सिंचन क्षेत्र वाढविण्याबाबत उपाययोजना करणे.*

या विषयांवर सविस्तर बैठक घेण्यात आली. या बैठकीत मा.ना. बच्चुभाऊ कडू जलसंपदा, राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनी संबंधीत अधिकाऱ्यासोबत सविस्तर चर्चा करुन वरील सर्व विषयांवर १५ दिवसाच्या आत तात्काळ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीला जलजसंपदा विभागाचे उपसचिव श्री चिल्ले साहेब, मा.ना. बच्चुभाऊ कडु यांचे खाजगी सचिव अनुपजी खांडे साहेब, श्री सब्बीनवार अधिक्षक अभियंता कडा औरंगाबाद, राज्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातील जलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी श्री.अनिल भटकर साहेब, श्री. नितीन क्षीरसागर साहेब, कार्यालयाचे मुख्य लिपीक श्री. धनंजय खांडेकर व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने आदींची उपस्थिती होती...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या