💥परभणी शहर तलाठी सज्जाचे विभाजन करून परभणी शहरासाठी नविन चार तलाठी सज्जे कार्यान्वीत करा....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या कडे मागणी💥

परभणी - परभणी शहर महानगरपालिका झाली असून संपूर्ण शहराकरीता एकच तलाठी सज्जा कार्यान्वीत आहे. जेव्हा हा तलाठी सज्जा कार्यान्वीत करण्यात आला होता त्या वेळच्या परभणी शहराच्या लोकसंख्येच्या मानाने आज शहराची लोकसंख्या तीन ते चार पटीने वाढली आहे. परभणी शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता परभणी शहराकरीता किमान चार तलाठी सज्जा असणे आवश्यक आहे.


सद्यपरिस्थितीत एकच तलाठी सज्जा असल्यामुळे बरीचशी प्रकरणे वर्षानुवर्ष प्रलंबित राहत असल्याने शहरातील नागरीकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय एक तलाठी असल्याने शासनाचा महसूल वेळेवर व जमा होत नाही. शहर आपत्ती व्यवस्थापणामध्ये परभणी शहर तलाठी हा महत्वाचा घटक असून त्यावर पूर्ण शहराचे आपत्ती व्यवस्थापन नियोजन करणे, पंचनामे करणे, मदत पुरविणे व इतर महत्वाची कामे प्राधान्य क्रमाने होत नाहीत. मागील दोन महिन्यापूर्वी ११ जूलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमध्ये परभणी शहरातील अनेक भागामध्ये पावसाचे पाणी घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्या बाधीत कुटूंबापैकी अनेकांना अद्यापही मदत मिळालेली नाही. तसेच निवडणूकीची कामे सुध्दा एकाच तलाठयाला करावी लागत आहेत. तलाठी सज्जा कार्यालयात सामान्य लोकांची, विद्यार्थी व महिलांची आवश्यक त्या प्रमाणपत्रासाठी तुफान गर्दी होत आहे या करिता परभणी शहराचे समान विभाजन करून चार तलाठी सज्जा कार्यान्वित करावे या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडम यांना देण्यात आले आहे.


कोवीड -१९ संक्रमण पार्श्वभूमीवर अशी गर्दी ही कोवीडला निमंत्रण देणारी ठरु शकते. करीता आपणास विनंती आहे की, या प्रकरणी आपण लक्ष घालून त्वरीत परभणी शहराचे चार समान भाग करून शहर सज्जाचे विभाजन करून परभणी शहरासाठी नविन चार तलाठी सज्जा कार्यालय कार्यान्वीत करावे जेणे करून परभणी शहरातील जनतेला न्याय मिळेल व शासनाचा महसूल पण मोठ्या प्रमाणात मिळेल. असे ही या निवेदनात म्हटले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, युवा आघाडी तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण, शेतकरी आघाडी तालुका प्रमुख नारायण ढगे, मिडिया प्रभारी नकुल होगे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, लोहगाव सर्कल प्रमुख मंगेश वाकोडे, झरी सर्कल प्रमुख शाम भोंग, वैभव संघई  इत्यादींनी स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या