💥सर्व धर्मियांना समान न्याय देण्याचीच भुमिका - आमदार बाबाजानी दुर्रानी


💥श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी आयोजित व्यापारी पदाधिकारी नियोजन बैठकीत बोलतांना आ.दुर्रानी यांचे प्रतिपादन💥


✍🏻किरण घुंबरे पाटील

पाथरी:-आपण आज पर्यंतच्या राजकिय वाटचालीत नेहमी सर्व धर्मियांना न्याय देण्याची माझी भूमिका राहिली आहे, हे सुंदर असे राम मंदिर  माझ्या निधीतून झाले असून याचा मला अत्यंत आनंद होत  असल्याचे प्रतिपादन आ बाबाजानी दुर्रानी यांनी पाथरीतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्या साठी आयोजित व्यापारी पदाधिकारी नियोजन बैठकी दरम्यान शुक्रवार २२ ऑक्टोबर बोलतांना व्यक्त केले.


पाथरी येथील श्री राम मंदिर सभागृह येथे २५ ते २८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा व लोकार्पण सोहळा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य धार्मिक कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार बाबाजानी दुर्रानी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नेते मुंजाजीराव भालेपाटील, सुभाष आबा कोल्हे माजी जिल्हा परिषद सभापती , दादासाहेब टेंगसे जिल्हा परिषद सभापती ,चक्रधर उगले समता परिषद जिल्हाध्यक्ष,दत्तराव मायंदाळे संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक परभणी,सदाशिवराव थोरात सभापती पंचायत समिती पाथरी,नितेश भोरे, नगराध्यक्ष पाथरी हन्नान खान  दुर्राणी उपाध्यक्ष न. प. पाथरी हे होते.


पुढे बोलतांना आ दुर्रानी म्हणाले की, या राम मंदिरा साठी मी वाढीव निधीची तरतूद केली असून यातून दोन खोल्या व कंपाउंड वॉल चे काम करण्यात येणार आहे.आज पर्यंत अनेक मंदिरे , समाज मंदिर, शादीखाना, खान खा , बौद्ध विहार  साठी मी निधी दिला असून. कायम विकासात्मक काम करण्याचा माझा प्रयत्न राहिला आहे असे ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक आलोक चौधरी यांनी केले तसेच यावेळी अॅड मुंजाजीराव भालेपाटील, दादासाहेब टेंगसे, चक्रधर उगले,दत्तराव मायंदाळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ॲड . बी. बी.तळेकर यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वितते साठी आलोक चौधरी,किरण भालेपाटील, राजीव पामे, रिंकू पाटील, गोविंद हरकळ, विठ्ठलराव रासवे, सुनील उन्हाळे,गजानन उंबरकर, श्रीकांत चौधरी, प्रशांत चौधरी, विजयकुमार चौधरी, योगश महाजन, अमोल भालेपाटील,अजय वांगीकर, शिरीष दडके, पिंटू चिकणे ,मकरंद खारकर, प्रशांत चिद्रवार, संजय हराळे, अवधूत चौधरी, किरण विहिटकर, माऊली पौळ, बाळासाहेब रसाळ, अरुण दैठणकर,राहुल भोकरे  इ परिश्रम घेतले. या कार्यक्रमा साठी  सर्व नगरसेवक , पदाधिकारी, व्यापारी व प्रतिष्ठात नागरिक उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या