💥पुर्णेत वर्षावास व ग्रंथ वाचनाचा समारोप....!

              


💥कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भन्ते पय्यावंश यांची उपस्थिती होती💥

भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास काळात मागील तीन महिन्यांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित "बुध्द आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे वाचन डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह या ठिकाणी चालू होते आज दिनांक 24-अॉक्टोबर 21 रविवार रोजी वर्षावास व ग्रंथ वाचन समारोपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून भन्ते पय्यावंश यांची उपस्थिती होती.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हा शाखेचे अध्यक्ष विश्वनाथ झोडपे, भारत देवरे, पि. एल. वानखडे, एन. जी. गोधम व लक्ष्मण गायकवाड हे उपस्थित होते. भन्तेनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. माता रमाई महिला मंडळाच्या वतीने भन्तेजींना चिवर व फळे दान करण्यात आले. तसेच तुकाराम ढगे व अतुल गवळी यांना शुभ्र वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. ग्रंथ वाचक तुकाराम ढगे सरांनी औपचारिकरीत्या ग्रंथ वाचन करून समारोप केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर ढाकरगे सरांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माता रमाई महिला मंडळाच्या वतीने उपस्थित इतर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय समारोपानंतर पुज्य भन्ते पय्यावंश यांनी उपस्थितांना धम्म देसना दिली. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे एम. यु. खंदारे, बि. बि. वाघमारे, ज्ञानोबा जोंधळे, मुंजाजी गायकवाड, गौतम वाघमारे, भिमराव वाटोडे, विजय जोंधळे, एच. आर. ढाकरगे, एस. एन. गायगोधने, शंकर तुपसमुंदरे, त्र्यंबक कांबळे, अमृत कराळे, उमेश बार्हाटे, सुनील खाडे समता सैनिक दलाचे विश्वनाथ कांबळे, राहुल कचरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गवळी यांनी केले. शेवटी आशीर्वाद व सरणत्तय गाथेने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रमा नंतर सर्व उपस्थितांना उपा. ज्ञानोबा जोंधळे यांच्या कडुन खिरदान करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या