💥मंगरूळपीर येथे महिला व मुलींसाठी समुपदेशन व सल्ला केंद्राचे उद्घाटन...!


💥केंद्राचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे व त्यांच्या पत्नी राजश्री यशवंत केडगे यांच्या हस्ते करण्यात💥


✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-मंगरूळपीर येथे  दिनांक 17 /10 /2021 रोजी रविवारी महिला व मुलींसाठी समुपदेशन व सल्ला केंद्र ध्यास व जिव्हाळा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असून या केंद्राचे उद्घाटन मंगरूळपीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे व त्यांच्या पत्नी राजश्री यशवंत केडगे यांच्या हस्ते करण्यात आले.


याप्रसंगी यशवंत केडगे उपविभागीय पोलीस अधिकारी उद्घाटक म्हणून होते,तर अध्यक्षा राजश्री केडगे ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे अनिल कुमार शर्मा , रविशंकर दिक्षीत ,  विनोद डेरे  यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.केंद्राच्या संचालिका अवताडे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री यशवंत केडगे  यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच सौ. राजश्री यशवंत केडगे यांचे शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन  स्वागत केले. कार्यक्रमाचे सुंदर सुत्र संचालन व प्रास्तावीक  मेघा नगरनाईक यांनी केले. यावेळी महीला व मूलीसाठी समुदेशन व सल्ला केंद्राची कामकाजाची माहीती दिली यावेळी चंदाताई ठाकूर ,गीता बजाज, शिल्पा मांढरे,शुभांगी भोजने , मानेकर, रक्षा शर्मा,कु.जानवी औताडे व मंगरुळपीर शहरातील विविध भागातील महीला व मुलींची उपस्थिती होती....


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या