💥गुंठेवारी क्षेत्रातील बांधकामे तोडण्यास तूर्त स्थगिती,पालकमंत्री सुभाष देसाई यांचे निर्देश...!


💥असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पालिका प्रशासनाला दिले💥

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर/औरंगाबाद (दि.२५ आक्टोंबर) - शहरातील त्रिमूर्ती चौक, जवाहर कॉलनी ते आकाशवाणी चौक या रस्त्यावर असलेली गुंठेवारी क्षेत्रातील वाणिज्यिक (कमर्शिअल) बांधकामे तोडण्याचे महापालिका प्रशासनाने तयारी केली आहे. मात्र, दिवाळीचा सण समोर असताना ही कारवाई तूर्त स्थगित करावी, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पालिका प्रशासनाला दिले. तूर्त ही तोडफोड होणार नसली तरी गुंठेवारीतील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा उपयोग करून नियमानुकूल( रेग्युलराईज) करून घ्यावीत, असे आवाहन पालकमंत्री  सुभाष देसाई यांनी केले आहे....

  ✍️  मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या