💥पुर्णेत वर्षावास व ग्रंथ वाचन समारोप संपन्न...!


💥या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुज्य भन्ते डॉ उपगुप्त महाथेरो, भन्ते पय्यावंश व भन्ते संघरत्न यांची उपस्थिती💥


पूर्णा (दि.३१ आक्टोंबर) - भारतीय बौद्ध महासभा तालुका व शहर शाखा पूर्णा आणि वैशाली महिला मंडळ, अशोक नगर व विशाखा महिला मंडळ भिम नगर, पूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास काळात मागील तीन महिन्यांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित *"बुध्द आणि त्यांचा धम्म"* या ग्रंथाचे वाचन सुर्यपूत्र भैय्यासाहेब आंबेडकर सभागृह या ठिकाणी चालू होते आज दिनांक 30 अॉक्टोबर 21 शनिवार रोजी वर्षावास व ग्रंथ वाचन समारोपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून पुज्य भन्ते डॉ उपगुप्त महाथेरो, भन्ते पय्यावंश व भन्ते संघरत्न यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभा परभणी जिल्हा शाखेचे उपाध्यक्ष तथा केंद्रीय शिक्षक एम. एम. भरणे तालुका शाखेचे बि. बि. वाघमारे, एम. यु. खंदारे, माजी सरचिटणीस तुकाराम ढगे, शहर अध्यक्ष त्रिंबक कांबळे हे उपस्थित होते. भन्तेनी उपस्थितांना त्रिसरण पंचशील दिले. विशाखा व वैशाली महिला मंडळाच्या वतीने भन्तेजींना चिवर, फळे व चटई दान करण्यात आले. तसेच ग्रंथ वाचक मंजुषाताई पाटील व सेवा देणारे दत्ता पाटील यांना शुभ्र वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले व नंतर त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विशाखा व वैशाली महिला मंडळाच्या वतीने उपस्थित इतर महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षीय समारोपानंतर पुज्य भन्ते डॉ उपगुप्त महाथेरो व भन्ते पय्यावंश यांनी उपस्थितांना धम्म देसना दिली. या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे ज्ञानोबा जोंधळे, मुंजाजी गायकवाड, शामराव जोगदंड, किशोर ढाकरगे, अतुल गवळी, उमेश बार्हाटे, आनंद गायकवाड, यशवंत लांबसोंगे उपस्थित होते. तसेच या प्रभागाच्या विद्यमान नगरसेवीका सुमनबाई गायकवाड, मधुकर गायकवाड, दिलीप गायकवाड, यादवराव भवरे, मुकुंद पाटील आणि भिम नगर व अशोक नगर येथील बहुसंख्य उपासक उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन त्र्यंबक कांबळे यांनी केले. शेवटी आशीर्वाद व सरणत्तय गाथेने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या