💥पुर्णा नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रक्कमेसाठी पुकारला यल्गार...!

 


💥नगर परिषद कर्मचाऱ्यांनी कामबंद आदोलन करीत कार्यालया समोर केले धरणे आंदोलन💥

पुर्णा (दि.०५ आक्टोंबर) - येथील नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काल सोमवार दि.०४ आक्टोंबर २०२१ रोजी सातव्या वेतन आयोगाची राज्यशासनाने ठरवून दिल्याप्रमाणे थकीत रक्कम कर्मचाऱ्यांना तात्काळ अदा करा या मागणीसाठी नगर परिषद कार्यालया समोर धरणे आंदोलनास सुरूवात केली असून या आंदोलनाचा आज मंगळवार दि.०५ आक्टोंबर २०२१ रोजी दुसरा दिवस असून नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या बेमुद्दत आंदोलनाकडे अद्यापही नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी निलेश सुंकेवाड फिरकलेही नसल्यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासकीय यंत्रणा ठप्प पडल्याचे पाहावयास मिळत आहे.


शहरातील नगर परिषद कार्यालया समोरच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाची थकीत रक्कम तात्काळ अदा करावी या मागणीसाठी आंदोलनास सुरूवात केली असून या मागणी संदर्भात नगर परिषद कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी सुंकेवाड यांना काम बंद आंदोलनाचा इशारा देत मागील २७ सप्टेंबर २०२१ रोजी लेखी स्वरूपात निवेदन दिले होते या निवेदनात असे नमूद करण्यात आले होते की महाराष्ट्र शासनाने ७ व्या वेतन आयोगाची घोषणा करूनही जवळपास सरते एक वर्ष झाले असून देखील पुर्णा नगर परिषद कर्मचाऱ्यांना त्याचा अद्यापही लाभ मिळालेला नाही यापुर्वी देखील अनेकदा कर्मचाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना तोंडी चर्चा करून ७ व्या वेतन आयोगाच्या थकीत रक्कमेचा प्रश्न निकाली करीता विनंती केली होती परंतु या चर्चेतून काही एक निष्पन्न झाले नाही त्यामुळेच निश्क्रिय मुख्याधिकारी सुंकेवाड यांना या गोष्टींची जाणीव करून देण्याच्या उद्देशानेच नगर परिषद कर्मचाऱ्यांनी काम बंद व धरणे आंदोलनास सुरूवात केल्याचे निदर्शनास येत असून मुख्याधिकारी निलेश सुंकेवाड यावर काय निर्णय घेतात याकडे कर्मचाऱ्यांसह संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागलृले आहे.... टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या