💥 पुर्णा तालुक्यातील मौ.कठेश्वर येथील शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस शॉटसर्कीट मुळे जळून खाक....!


💥सातेगाव शिवारातील गट नंबर १६ मधील दोन एकर शेतातील उभा उस जळाल्याने ३ लाख रुपयांचे नुकसान💥 

पुर्णा (दि.०१ आक्टोंबर) - तालुक्यातील मौ.कंठेश्वर येथील शेतकरी संजय गंगाधरराव कदम व त्यांचे बंधू केशव गंगाधरराव कदम यांचे सातेगाव शिवारात गट क्रमांक १६ मध्ये दोन एकर शेती असून या शेतात त्यांनी ऊस लावला होता त्यांच्या शेतावरून मोठी मुख्य विद्युत वाहिणी गेलेली असून आज शुक्रवार दि.०१ आक्टोंबर रोजी दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास या विद्युत वाहिण्यांतील शॉट सर्कीट मुळे त्यांचा दोन एकर उभा उस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना झाली असून या घटनेत शेतकरी संजय कदम व त्यांचे बंधूकेशव कदम यांचे तब्बल ३ लाख रुपयांचे नुकसान झाले संबंधित शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करून विद्युत मंडळासह शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ  आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या