💥एनटीसीत वैद्यकीय क्षेत्रातील ६८ कोरोना योद्द्यांचा कृतज्ञता सन्मान....!


💥आई जगदंबा नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आला सन्मान💥 

हिंगोली - ( प्रतिनिधी) एनटीसी 

 येथील आई जगदंबा नवरात्र महोत्सव  समितीच्या वतीने कोरोना काळात जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णावर उपचार करणाऱ्या एनटीसी परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील ५२ तर शहरातील विविध रुग्णालयातील व शासकीय क्षेत्रात वैद्यकीय सेवा बजावणारे १६ डॉक्टर असे मिळून एकूण ६८ डॉक्टरांचा  कृतज्ञता सन्मान रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


एनटीसी येथे आई जगदंबा नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने  रविवारी  कोरोना काळात उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांसाठी कोरोना योद्धा कृतज्ञता सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ६८ डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, हिंगोली जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती  रूपालीताई पाटील गोरेगावकर, आयएमएचे  प्रदेश प्रतिनिधी डाॅ.  शिवाजी गिते, शिवपार्वती उद्योग समुहाचे प्रमुख  ज्ञानेश्वर मामडे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष  ज्योतीताई कोथळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी एनटीसी परिसरातील व शहरातील कोरोना योद्धयाचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक आई जगदंबा नवरात्र महोत्सव समितीचे अध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन उदय सोवितकर यांनी केले ,समितीचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजी वायभासे यांनी मानले यावेळी  खाजगी व शासकीय सेवेतील वैद्यकीय अधिकारी ,औषध विक्रेता , परिसरातील नागरिक, भाविकभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या