💥माझ्यावर केलेले आरोप बिनबुडाचे,सिध्द करून दाखवा - नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांचा भाजपावर पलटवार


💥चिखली शहरातील विकासकामे हीच नगराक्षांच्या कामांची पावती होय💥

✍️मोहन चौकेकर

चिखली :  दि. २० आँक्टोबर रोजी  भारतीय जनता पक्षाने भष्टाचाराचे आरोप करून निष्कासित केलेल्या चिखली शहराच्या नगराध्यक्षा सौ. प्रियाताई बोंद्रे आणि त्यांचे पती माजी उपाध्यक्ष कुणालभाऊ बोंद्रे यांनी भाजपाकडून त्यांच्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे, मनमानीचे आणि दादागिरीचे आरोप फेटाळले आहेत. आज दि. २२ आँक्टोबरला चिखली  शहरातील एमआयडीसी भागात बोलावलेल्या  पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप राजकीय हेतूने करण्यात आले असून त्यामध्ये अजिबात तथ्य नाही, याऊलट  केलेले आरोप सिद्ध करून दाखवा असा पलटवार करीत असे आव्हान भारतीय जनता पक्षाला दिले. यापुढे असे बिनबुडाचे आरोप झाल्यास कायदेशीर कारवाई करु असा इशारा देखील प्रिया बोंद्रे आणि कुणाल बोंद्रे यांनी भाजपाला दिला आहे.

नगराध्यक्षा सौ प्रियाताई बोंद्रे आणि त्यांचे पती माजी उपाध्यक्ष कुणालभाऊ बोंद्रे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे नगरसेवक गोपाल देव्हडे आणि मार्केट कमिटीचे संचालक काशिनाथभाऊ बोंद्रे, युवा नेते जय बोंद्रे  हे देखील उपस्थित होते आ.श्वेताताई महाले यांच्यावर टिका करताना नगराध्यक्षा सौ.प्रियाताई बोंद्रे म्हणाल्या की मी केलेल्या विकास कामांच्या जोरावर विधानसभा निवडणुकीत भाजपाने मते मागितली . विधानसभा निवडणुकीनंतर आमदार श्वेताताई महाले यांनी आमदार निधीशिवाय कुठलाही निधी खेचुन आणला नाही त्या नैराश्यातुन व मी चिखली शहरात केलेल्या विकासकामा बरोबर त्यांच्या विकासकामांची तुलना होवु लागल्याने त्रस्त झालेल्या आमदार श्वेताताई महाले यांना आमची वाढती लोकप्रियता सहन न झाल्याने त्यांनी पक्षातील त्यांच्या काही समर्थक व पदाधिकाऱ्यामार्फत  माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याचे कट कारस्थान केले .  माझ्यावर आरोप करून चिखली शहरात झालेली विकासकामे फक्त आणि फक्त नगराध्यक्षानीच केली‌ आहेत.याची पावती ( दुजोरा ) सुद्धा  परवा झालेल्या पत्रकार परिषदेत माझ्यावर आरोप करणा-या कडुनच मला मिळाली आहे.त्यामुळे नगराध्यक्षांनी केलेल्या विकास कामांवर मते मागण्याचा अधिकार आता विद्यमान आमदार यांना उरला नाही .त्यांनी स्वतः केलेली कामे चिखली शहर  व मतदारसंघात दाखवावी व नंतर मते मागण्यांचे काम त्यांनी करावे.स्वकर्तव्यातुन लोकहिताची कामे करणाऱ्या कार्यकर्त्यांना संपविण्याचा कुटील डाव याद्वारे माझ्या विरोधात रचण्यात आला येणाऱ्या निवडणुकीत जनताच ठरवेल की विकास कामांना गती देणारे की विकास कामांना गतिरोधक ठरणारे यापैकी कुणाचा न्याय निवाडा करायचा आहे....                          

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या