💥शिरूर कासार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शासनाने शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी - गोकुळ सानप


💥तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली मागणी💥

रायमोहा(प्रतिनिधी) शिरूर कासार तालुक्यात अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे नदी नाल्यांना महापुर आल्याने शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले आहे शिरूर कासार तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील शेतकरी बांधवांच उभं पीक वाहुन गेल्याच आणि शेतात गुडघ्यापर्यंत पाणी साचुन जमीनीवर मोठमोठे खड्डे पडल्याचे निदर्शनास आले आहे याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करुन हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी अँड सर्जेराव तात्या तांदळे युवा मंचचे अध्यक्ष गोकुळ सानप यांनी शिरूर कासारचे कर्तव्यदक्ष तहसीलदार श्रीराम बेंडे साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे तसेच तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात गोकुळ सानप यांनी म्हटले आहे की संपूर्ण शिरूर कासार तालुक्यात कापुस , तुर, सोयाबीन, उडीद , मुग, भुईमुग, ही पीके वाहून गेली आहेत यामुळे शेतकरी पुर्ण अडचणीत आला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे तरी तात्काळ शिरूर कासार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्या अशी मागणी अँड सर्जेराव तात्या तांदळे युवा मंचचे अध्यक्ष गोकुळ सानप यांनी शिरूर कासार तहसील कार्यालयाचे तहसीलदार श्रीराम बेंडे साहेब यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या