💥चित्रपट अभिनेता शाहरुख खान याचे चित्रपट व जाहीराती बंद करण्याची मागणी...!


💥अशी मागणी भाजपाचे तालुका सरचिटणीस राहुल अढाव तसेच तालुका सचिव गजानन धनवे यांनी केली आहे💥

फुलचंद भगत

वाशिम:-केंद्रीय माहिती प्रसारण अंतर्गत दाखविण्यात येणारे चित्रपट अभिनेता शाहरुख खान याचे चित्रपट व जाहीराती बंद करण्यात याव्यात अशी मागणी भाजपाचे तालुका सरचिटणीस राहुल अढाव तसेच तालुका सचिव गजानन धनवे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे केली आहे.


         निवेदनात नमुद असे की, शाहरुख खान यांच्या मुलगा नामे आर्यन याने जे समाजविघटक कृत्य केलेले आहे त्याचा परिणाम समाजमानवर जरुर होणार आहे. कारण की भारतातील 130 कोटी जनतेपैकी काही जन चित्रपट अभिनेता शाहरुख खान याला आपला आदर्श मानतात व तो इंडीयन ऑयडॉल म्हणुन त्याचा नावलौकीक आहे. परंतु त्याच्या मुलाच्या कृत्यामुळे जनतेने काय बोध घ्यावा? हा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.जो अभिनेता आपल्या मुलाला योग्य संस्कार देवु शकत नाही त्याच्या चित्रपटातुन व जाहीरातीमधुन जनतेने काय बोध घ्यावा. हयामुळे भारतीयामध्ये संभ्रम निर्माण झालेला असुन हे देशविरोधी कृत्य आहे व समाजमनावार याचा विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण

झालेली आहे. जे नागरीक शाखरुख खान याला डोक्यावर घेवुन नाचतात त्यांना सुध्दा निर्बंध घालणे जरुरीचे आहे. यामुळे अशा बाबीचा समाजमनावर विपरीत परिणाम होवु नये यामुळे अभिनेता शाहरुख खान त्याच्या चित्रपटावर व जाहीरातीव बंदी घालणे आवश्यक आहे कारण त्यामुळे देशाची दिशाभुल होत असुन एक प्रकारे दहशत निर्माण होत आहे त्यामुळे त्यांना योग्य जागा दाखविण्यासाठी आमचा लढा आहे. तरी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या