💥परळी तालुक्यातील पांगरी वाण नदीत काल वाहुन गेलेल्या गुराख्याचा मृतदेह आज सकाळी सापडला...!


💥परळी आपत्ती व्यवस्थापण,नगर परिषद अग्निशामक व ग्रामीण पोलिसांची मोठी मोहिम💥

परळी ; तालुक्यातील पांगरी वाण नदीच्या बंधा-या जवळ एक गुराखी शेतातुन जनावरांना घरी घेऊन जात असतांना वाहुन गेल्याची घटना काल गुरुवार दि.०७ आॕक्टोंबर रोजी सायंकाळी घडली होती.तालुका प्रशासनाला याची खबर मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शोध मोहिम सुरु केली माञ राञी पर्यंत गुराखी सापडला नव्हता राञ झाल्यामुळे व पाणी जास्त असल्या कारणाने शोध मोहिमेला अडथळा निर्माण झाल्याने शोध मोहिम थांबावावी लागली होती.

परंतु आज सकाळी जेव्हा या शोधमोहिमेने शोध सुरु केला प्रयत्नाअंती अखेर गुराख्याची मयत बाॕडी दिसुन आली आहे नदी पाञात वाहुन गेलेल्या गुराखीच नाव ज्ञानोबा शंकर शिंदे वय ५५ वर्ष राहणार लऊळ तालुका माजलगाव जिल्हा बीडचा असुन तो आता मुक्काम मौजे पांगरी येथे रहिवासी आहे.

सदर माहिती अशी आहे कि,ज्ञानोबा शिंदे नामक गुरुखी शेतातून गुरे चारुन घरी येत असताना वाण नदीत वाहून गेला. स्थानिक नागरीकानी नायब तहसीलदार बाबुराव रुपनर व नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी अग्निशामक पथकाचे सुनिल अदोडे यांना खबर दिली होती.

नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथक घटना स्थळी दाखल होऊन काल चार ते पाच तास गुराख्याचा शोध घेतला पण नदीला पाणी जास्त असल्यामुळे व राञ होत असलेल्याने ही शोधमोहिम थांबवावी लागली होती.परंतु आज सकाळी पहाटेच परत या गुराख्याचा शोध घेण्यास सुरु करण्यात आली नगरपरिषद आपत्ती व्यवस्थापन पथकाला अखेर मयताची बॉडी दिसुन आली आहे.याकामी काल पासुन तहसील,पोलिस व परळी नगर परिषद प्रशासनाने अथक परिश्रम घेतले आहे.मयत ज्ञानोबा शिंदे यांची डेथबाॕडी पोलिस पंचनामा करुन शवविच्छदनासाठी पाठवण्यात येईल असे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांनी सांगितले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या