💥पुर्णा शहरातील राष्ट्रीयकृत बँकाच्या एटीएमचे गाढव महाराज बनले चौकीदार...!


💥राष्ट्रीयकृत बँकांतील अधिकारी मानताय 'बिन पगारी फुल अधिकारी' चौकीदार गाढव महाराजांचे आभार💥

पुर्णा (दि.११ आक्टोंबर) - शहरातील चोवीस तास आर्थिक व्यवहाराचे केंद्र अर्थात एटीएम मशीन (ऑल टाईम मनी) वर मोकाट गाधवांनी अक्षरशः ताबा मिळवल्याचे निदर्शनास येत असून शहरातील महाविर नगर या उच्चभ्रू वसाहतींमध्ये असलेल्या भारतीय स्टेट बँक,महाराष्ट्र बँकांच्या एटीएम केंद्रांवर बँक प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून चौकीदारांची नेमणूक केली नसल्याचे या एटीएम केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण जवाबदारी शहरातील मोकाट गाधव महाराजांनी विनामुल्य अर्थात बिन पगारी फुल अधिकारी बनून उचलल्याचे निदर्शनास येत आहे.


शहरातील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम असो की महाराष्ट्र बँकेचे एटीएम एटीएम धारकांच्या स्वागतासाठी 'गाढव महाराज' सज्जच असतात या संदर्भात अनेक वेळा सदरील बाब भारतीय स्टेट बँक व महाराष्ट्र बँक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ही संबंधित बँकांतील अधिकारी एटीएम केंद्रांतील या गाढवांच्या ताबेदारीकडे दुर्लक्ष करून गाढव महाराजांच्या चौकीदारीला पाठींबा देत ! असल्यामुळे एटीएम केंद्रांवर गाढव महाराजांचे साम्राज्य निर्माण झाल्याचे दिसत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या