💥कोंडाळा महाली येथे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना...!


💥धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-येथून जवळचं असलेल्या ग्राम कोंडाळा महाली येथे 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्तीची स्थापना करण्यात आली. यावेळी  कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंचां सीमाबाई आघम होत्या तर या मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे समुपदेशक प्रभू कांबळे,प्रा नरेश चव्हाण हे होते.


यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला कार्यक्रमांचे अध्यक्ष व उपस्थित प्रमुखं पाहुणे यांनी 65 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरवात झाली. पुज्यनिय भंते मोगलायन यांनी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील, धम्मदेसना दिली.नंतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्धांची आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी उपस्थितांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्मच या देशाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो. म्हणून जगाला युद्धाची नव्हे तर बुद्धाच्या विचारांची गरज आहे.यावेळी प्रा.ज्ञानेश्वर आघान, प्रा विजय आघाम, जीवन तायडे, प्रा. नरेश जाधव,यांनी आपले विचार व्यक्त केले.यावेळी या कार्यक्रमाचा गावांतील संघशक्ती तरुण मंडळ सर्व सदस्य समता सैनिक दल महिला व समस्त बुद्ध उपासिका उपासक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सुरेश आघम यांनी केले.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या