💥फेसबूक लवकरच री-ब्रँडिंग करणार : म्हणजेच फेसबुक आपले नाव बदलणार....!

 


💥मार्क झुकेरबर्गने 2004 मध्ये एक सोशल मीडिया कंपनी म्हणून फेसबूकची सुरुवात केली होती💥

✍️ मोहन चौकेकर

फेसबूक लवकरच री-ब्रँडिंग करणार आहे.. म्हणजेच फेसबुक आपले नाव बदलणार असून, याबाबतची घोषणा लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. फेसबूकच्या री-ब्रँडिंगचा फेसबूकसह इन्स्टाग्राम व व्हाॅटस अ‍ॅपच्या यूजर्सवर थेट कोणताही परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येते.

मार्क झुकेरबर्गने 2004 मध्ये एक सोशल मीडिया कंपनी म्हणून फेसबूकची सुरुवात केली होती. सध्या फेसबुक अंतर्गत अनेक कंपन्या काम करतात. त्यामुळे फेसबूक आता आपल्या सगळ्या कंपन्या एकाच 'ब्रँड नेम' अंतर्गत आणणार आहे. व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्याची मदत होईल, असा कंपनीला विश्वास आहे.

💥सेवेत बदल होणार नाही :-

फेसबूकचे री-ब्रँडिंग करण्यात आले, तरी मूळ अ‍ॅप आणि सेवेच्या ब्रँडिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही. ब्रँडच्या नावात बदल करणारी फेसबुक ही काही पहिलीच कंपनी नाही. 'गुगल'नेही याआधी 2016 मध्ये री-ब्रँडिंग करीत 'अल्फाबेट' (Alphabet) केले होते.

 दरम्यान, याबाबत अद्याप फेसबुकने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सध्या फेसबूकमध्ये अनेक नवीन प्रोजेक्टवर काम सुरु आहे. एका रिपोर्टनुसार, फेसबुक स्मार्टफोनवरही काम सुरु असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कंपनीला आता सर्व व्यवसायांचे व्यवस्थापन करायचे असल्याने री-ब्रॅंडिंग करण्याचा निर्णय घेतला आहे....

  ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या