💥परभणी-मनमाड दुहेरीकरणासह विविध रेल्वे प्रश्न तात्काळ सोडवा.....!


💥प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रम्बधनक गजानन मल्या यांना दिले निवेदन💥

परभणी/प्रतिनिधी*

दक्षिण-मध्य रेल्वे विभागाचा महाव्यवस्थापक श्री गजानन मल्या यानी दि.12 आक्टोबर रोजी रात्री 9.30 वाजता परभणी स्थानकावर आले असताना मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे सदस्यांनी त्यांच्या भेट घेऊन विभागातील रेल्वे प्रश्नांबाबत चर्चा केली त्यात प्रामुख्याने परभणी ते मनमाड दरम्यानच्या दोहेरीकरणाला प्राधान्य द्यावे तसेच मराठवाडयातून विविध गाड्या सुरू करणे, रद्द  केलेली पनवेल औरंगाबाद मार्गे चालवण्याची मागणी यावेळी करण्यात आली.  औरंगाबाद येथील तपासणी करून परभणी मार्गे जात असलेल्या दमरेचा रेल्वे महाप्रम्बधनक  गजानन मल्या यांना परभणी स्थानकावर येताच प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्या त्यांच्यापुढे रेटल्या त्यात औरंगाबाद-नागपूर दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे चालविणे, मुंबई-जालना जनशताब्दी एक्सप्रेसला हिंगोली पर्यंत तत्काळ विस्तार करणे, आता कोरोना महामारीचा खतरा टळला असल्याने सर्व रेल्वे गाड्यांची विशेष दर्जा रद्द करून, लाॅकडाउन पूर्वीचे टिकट दर निर्धारित करून कमीत करावेत, विभागातील सर्व रेल्वे गाड्यांची लूज टाईम रद्द करून वेग वाढविणे, देवगिरी सहीत विभागातील सर्व जलद गाड्यात नवीन LHB कोचेस सुविधा जोडावा, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्सप्रेस रेल्वेत आणखी पाच स्लीपर कोच वाढविण्यात यावेत, सर्व रेल्वे गाड्यांमध्ये जनरल टिकट सुरू करण्यात यावेत, विभागातील सर्व जलद आणि सवारी गाड्या ना तत्काळ सुरू करावेत या व इत्यादी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, प्राचार्य सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, मोहम्मद कादरी, प्रवीण थानवी ,वसंत लंगोटे, महेश बासटवार, आनंद देशमुख,दीपक अग्रवाल,किशोर डावरे,मोहन पांचाळ आदीनी  केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या