💥नांदेड-पनवेल एक्स्प्रेस १४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान मार्ग बदलून धावणार...!


💥जनतेची मागणी लक्षात घेवून हि गाडी रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे ने बदलला आहे💥

परभणी:ता.14- गाडी संख्या ०७६१४  नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस  १४ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर दरम्यान आणि गाडी संख्या ०७६१३ पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस  १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली असल्याचे कळविले होते. 

परंतु जनतेची मागणी लक्षात घेवून हि गाडी रद्द करण्याचा निर्णय मध्य रेल्वे ने बदलला आहे. 

आत्ता १४ ऑक्टोबर ते २८  ऑक्टोबर दरम्यान हि गाडी पूर्वी प्रमाणेच परंतु बदलेल्या मार्गाने धावेल. 

ती पुढील प्रमाणे ; - 

1) गाडी संख्या ०७६१४ नांदेड ते पवनेल एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच नांदेड येथून सुटेल, परंतु दिनांक १४ ऑक्टोबर ते २७  ऑक्टोबर दरम्यान हि गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच लातूर रोड, कुर्डूवाडी , मिरज, पुणे या मार्गाने धावेल. 

2)  गाडी संख्या ०७६१३ पवनेल ते नांदेड  एक्स्प्रेस पूर्वी प्रमाणेच पनवेल येथून सुटेल. परंतु दिनांक १५ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर दरम्यान हि गाडी बदलेल्या मार्गाने म्हणजेच पुणे, मिरज, कुर्डूवाडी, लातूर रोड या मार्गाने धावेल. 

वरील कालावधीत म्हणजेच दिनांक १४ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर, २०२१  दरम्यान मध्य रेल्वे मध्ये  सोलापूर विभागातील भालवानी ते वाशिंबे दरम्यान २६.३३  किलोमीटर चे दुहेरीकरणाचे कार्य पूर्ण करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग हाती घेण्यात येणार आहे. यामुळे काही गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे.  यापैकी नांदेड विभागातुन धावणारी पनवेल एक्स्प्रेस वरील उल्लेखिलेल्या कालावधीत मार्ग बदलून धावेल हे प्रवाशांनी लक्षात घावेअसे दक्षिण मध्य रेल्वे विभागाने कळवले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या