💥वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे पञकारांनी अविनाश मराठे यांना वाहीली श्रद्धाजंली...!


💥दैनिक हिंदुस्थान कार्यालयात पत्रकारांनी वाहिली श्रध्दांजली💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-कारंजा येथे दैनिक हिंदुस्थानचे  संस्थापक संपादक जेष्ठ स्वातंञ सेनानी  बाळासाहेब मराठे यांचे सुपुञ दैनिक हिंदुस्थानचे व पञकारांचे आधारस्तंभ अविनाश मराठे यांचे दिनांक २७| १०|२०२१ रोजी स्ंध्याकाळी ८|३० वाजताचे दरम्यान ह्रदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.


त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्याकरिता दिनांक २९|१०|२०२१ रोजी दुपारी ३|०० वाजता  कारंजा पञकार मंच व दैनिक हिंदुस्थान कार्यालय कारंजा येथे  जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथजी राउत यांचे मार्गदर्शनाखाली  कारंजा येथील कार्यालयात श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी कारंजा पञकार मंच अध्यक्ष दिलीप रोकडे ,विजय गागरे उपाध्यक्ष, विलास राउत, किरण क्षार सचिव, एकनाथ पवार ,महमंद मुन्नीवाले, संजय कडोळे, फिल्म अभिनेता समशेरखान, ओंकार ढेल ,जहीरभाई,पञकार फुलचंद भगत यांच्या उपस्थितीत अविनाश मराठे यांना भावपुर्वक श्रध्दांजली वाहण्यात आली.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या