💥पुर्णेतील प्रभाग ०७ मधील गंभीर प्रकार ; बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत बोगस मतदार नाव नोंदणी....!


 💥माजी नगरसेवक तथा टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी केली तक्रार ; जिल्हाधिकारी दखल घेतील काय ?💥

पूर्णा (दि.२३ आक्टोंबर) - पुर्णा नगर परिषदेच्या होणाऱ्या आगामी निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने मतदार याद्यांमध्ये नांव नोंदणी कार्यक्रमाची सुरूवात केली असून शहरातील विविध प्रभागातील याद्यांमध्ये आपल्या सोईनुसार आपल्या मर्जीतील बोगस मतदारांचा समावेश करून कोणत्याही परिस्थितीत 'साम-दाम-दंड-भेदा' आदी चार तत्वांचा अवलंब करून निवडणूक जिंकायची असा दृढनिश्चय प्रस्थापितांनी केल्याचे निदर्शनास येत असून त्याची सुरूवात प्रथमतः निवडणूक याद्यांमध्ये बोगस मतदारांच्या नावांचा समावेश करून झाल्याचे निदर्शनास येत आहे.



पुर्णा शहरातील प्रभाग क्र.०७ परिसरातील मतदार यादी भाग क्रमांक २०३ मध्ये आजी/माजी ईच्छुक उमेदवार बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने मतदाररांची नावे यादीत समाविष्ट करत असल्याची तक्रार महाराष्ट्र भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक सुनिल जाधव यांनी पुर्णेच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

       पुर्णा शहरातील प्रभाग क्र.०७ मधील हरिनगर पंचशील नगर, विजयनगर रेल्वे वसाहत आदीं परिसर येतो.त्याचा मतदार यादी भाग क्र २०३ आहे. आयोगाने मतदार याद्यांमध्ये नाव समाविष्ट करणे पुनर्निरीक्षण कार्यक्रमा अंतर्गत निवडणुकी साठी इच्छुक परिसरातील आजी/माजी उमेदवार नांव नोंदणी करण्यासाठी सरसावले आहेत.या भागातील मतदार हा येथील रहीवाशी नसताना त्यांच्या नातेवाईकांची नांवे यादीत नसताना तसेच आधार कार्ड वर संबंधित परिसराचा पत्ता नसताना ही ऑनलाईन पदतीत बनावट कागद पात्रांच्या साह्याने मतदार यादी मध्ये समाविष्ट करण्याचा सपाटा लावला आहे.  या कामी प्रशासनाने बि.एल.ओ ना नियुक्त केले आहे. त्यांच्या कडे मतदार याद्यांचे काम असताना त्यांना परत प्रशासनाने लसिकरण मोहीमेसाठी नियुक्त केले आहे.त्यामुळे मतदार यादीत नावे नोंदवण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी पंचनामा केला जात नाही. याचा येथिल  राजकीय पुढारी गैरफायदा घेऊन या भागात जास्तीत जास्त मतदान यादी मध्ये नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे तहसीलदारांनी यात लक्ष केंद्रित करून संबंधित बि.एल.ओंना कागदपत्रांची पडताळणी करून नांवे नोंदवण्याचे आदेश द्यावे तसेच बोगस लोकांची समाविष्ट नांवे वगळून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी अशी मागणी सुनिल जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या