💥वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ समाजसेवक मास्टर प्रा.अनिल कांबळे राबवत आहेत गोर गरीब गरजवंतांना वस्त्रदानाची मोहिम...!


💥मास्टर अनिल कांबळे यांच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून होत आहे कौतुक💥 

कालवश रामभाऊ कांबळे यांच्या स्मृतीत निमित्ताने एक स्तुत्य उपक्रम अनिल रामभाऊ कांबळे राबवीत आहेत गेले एक महिन्यापासून त्यांनी गरजू व गरीब बेघर बेसहारा अशा लोकांना शोधून वडिलांचे असलेले व नवीन ड्रेस सफारी ड्रेस ते देत आहेत सातत्याने नवनवीन उपक्रम राबवणारे अनिल कांबळे यांनी या उपक्रमातून सामाजिक जाणीव ठेवून लोकांना ड्रेस देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे गोरगरीब व निराधार लोकांना शोधून त्याना अशा पद्धतीने कपडे भेट देत आहेत रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शहरात असलेले प्रत्येक चौका चौकत अशा ठिकाणी जाऊन ते गरजवंतांना शोधत असतात आपल्या गाडीत असलेल्या गट यातून ते त्या व्यक्तीच्या मापाचे कपडे काढून त्यांना देतात गोरगरिबांना कपडे त्याच बरोबर आर्थिक मदतही ते करत असतात या उपक्रणातून आपणही ज्यांना जे हवं ते उपलब्ध करून देण्यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात.



माणुसकीची जाण ठेवून माणुसकी जपणारे असे अवलिया अनिल कांबळे यांच्या रूपाने आपणास पहावयास मिळते अन्याय अत्याचार झालेल्या लोकांना मदत करणे गोरगरिबांना गरजूंना आर्थिक मदत करणे रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय मदत करणे रक्त उपलब्ध व रक्त दान करणे अशा वेगवेगळ्या उपक्रमातून ते सातत्याने माणुसकीचे दर्शन घडवत असतात अपघात ग्रस्तांना मदत करणे अशा प्रकारची ही सामाजिक उपक्रम ते राबवत असतात विशेष म्हणजे रस्त्यावर अपघातात मरून पडलेले जनावरे रस्त्याच्या बाजूला सारून त्यांच्या शेवाची होणारी हेळसांड होऊ नये म्हणून प्रामुख्याने ते रस्त्यात पडलेली शव त्यांचे सहकारी डी बी पाटील,बी पी सोनवणे हेही  उचलून बाजूला करतात आपण जगत असताना आपले जीवन सतत इतरांच्या उपयोगी पडावे माणसाने माणुसकी जपावी अशी शिकवण आपल्या आई वडिलांची आहे ति मि पुढे चलावत आहे असे ते सतत म्हणतात अश्या पद्धतीचे उपक्रम आपण राबविले पाहिजे असे ते लोकांना सतत सांगत असतात माणसापेक्षा माणूस मोठा नाही वेळही प्रत्येकावर येत असते म्हणून प्रत्येकाने गरजूंना मदत केली पाहिजे असे ते म्हणतात माणसाने माणसासाठी जगावे प्रत्येकाला मानसन्मान जगू देण्यास मदत करावी एवढीच काय ते माणुसकी जपावी असा संदेश ते आपल्या वागण्यातून देत नसतील प्रत्येकाने असे वागावे म्हणजे गरजूंना मदत होईल व त्यांच्या जीवनात आनंद येईल असंच म्हणावं लागेल...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या