💥गंगाखेडच्या कृतज्ञता मेळाव्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रण...!


🔹गंगाखेडला मंत्री छगन भुजबळ यांचे जोरदार स्वागत 🔹

गंगाखेड : अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे आज गंगाखेड येथे जोरदार स्वागत करण्यात आले. ओबीसींचे राजकीय आरक्षण मिळवून देणाऱ्या भुजबळ यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गंगाखेड येथे आयोजीण्यात येणाऱ्या कृतज्ञता मेळाव्याचे निमंत्रण समता परिषदेचे जिल्हा ऊपाध्यक्ष गोविंद यादव यांनी यावेळी त्यांना दिले. 


नांदेडहून बीड कडे जात असताना छगन भुजबळ यांची गंगाखेड येथे धावती भेट झाली. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात समता परिषद आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. फटाक्यांची आतीषबाजी करत समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने धनगर आरक्षण संदर्भात निवेदन सादर करण्यात आले. 

समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर ऊगले, जिल्हा ऊपाध्यक्ष तथा कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव भोसले, कॉंग्रेस अनुसूचीत विभाग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बालासाहेब यादव, माजी पं. स. सदस्य शिवाजी नायकल, पाथरी तालुकाध्यक्ष संतोष  वाघमारे, बांधकाम सभापती गोविंदराव हरकळ, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश संघटक विठ्ठलराव तळेकर, धनगर साम्राज्य सेनेचे अध्यक्ष सखाराम बोबडे,  गंगाखेड नगर परिषद सदस्य अजीजभाई, माजी नगरसेवक दिलीप सारडा, माजी पं. स. सदस्य लिंबाजी देवकते, रामेश्वर बचाटे, युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस सिद्धार्थ भालेराव, शहराध्यक्ष नागेश डमरे, माणिक भोकरे, माजी सरपंच नारायण घनवटे, बाळासाहेब सोनटक्के, सतीष शिंदे, रणजीत शिंदे, रमेश यादव, सागर गोरे, गंगाराम यादव, राजू सोळंके, मुंजाभाऊ लांडे, महेश मुंडे, नितीन वालेकर आदिंसह बहुसंख्य कार्यकर्ते ऊपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या