💥राष्ट्रवादी जलसमृद्धी व जनसंपर्क अभियानाचा लाभ घ्यावा -- शंतनू बोंद्रे


💥बऱ्याच गावातील लाभधारक शेतकऱ्यांना याचा पूर्ण लाभ घेता आलेला नाही💥

✍️ मोहन चौकेकर

चिखली :- बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथील खडक पूर्णा प्रकल्पातील प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन अंदाजे 14 वर्षे पूर्ण झाली आहेत या प्रकल्पाच्या उपसा सिंचन टप्पा क्रमांक 3 व 4 मध्ये जवळपास 150 किलोमीटर लांबीचे कालवे आहेत व जवळपास 25 हजार एकर जमीन ओलिताखाली येत आहे या प्रकल्पाचे कालव्याचे व त्यांच्या चोऱ्या मोर्‍याचे काम बऱ्याच ठिकाणी पूर्ण झालेली आहे व काही भागात बरीच कामे अपूर्ण सुद्धा आहेत त्यामुळे बऱ्याच गावातील लाभधारक शेतकऱ्यांना याचा पूर्ण लाभ घेता आलेला नाही. 

त्यामुळे बऱ्याच गावातील लाभधारक या अडचणी दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी शंतनु भारत बोंद्रे यांच्या नेतृत्वामध्ये व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब माजी मंत्री भारत बोंद्रे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाजेर काझी तसेच पक्ष निरीक्षक रवींद्र तौर यांच्या मार्गदर्शनाखाली जल समृद्धि व जनसंपर्क अभियानाचा लाभ घ्यावा असे आवाहन शंतनु भारत बोंद्रे यांनी केले आहे. 15 ऑक्टोंबर 2019 रोजी चिखली तालुक्यातील मलगी या ठिकाणच्या महादेव मंदिरा पासून  या अभियानाची सुरुवात  करण्यात आली असून या अभियानामध्ये खडकपूर्णा प्रकल्प उपसा सिंचन योजना टप्पा क्रमांक 3 व 4 च्या लाभ क्षेत्रातील सर्व ठिकाणी पाणी पोहोचवणे टप्पा क्रमांक 3 अंतर्गत वसंत नगर भरोसा अमोना कोनड देऊळगाव धनगर शेळगाव आटोळ अंचरवाडी पिंपळवाडी काळोणा व 4 अंतर्गत मेरा खुर्द रामनगर काटोडा कोलारा भालगाव येवता मुरादपुर गांगलगाव रोहडा मलगी इत्यादी लाभ क्षेत्रातील लाभधारकांना पाणी मिळण्यास निर्माण झालेल्या अडचणी दूर करणे कालव्यात संपादित झालेल्या जमिनीचा मोबदला ज्यांना मिळाला नाही त्याबाबत कार्यवाही करणे पाणी वापर संस्था कार्य नीट करुन सक्षम करण्यास सहकार्य करणे खडकपूर्णा प्रकल्प अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत लाभधारक शेतकऱ्यांचा समन्वय साधून प्रयत्न करणे व प्रकल्प संबंधित येणाऱ्या लाभधारकांच्या इतर अडचणी दूर करणे यासारखे उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस सिंदखेडराजा विधानसभा अध्यक्ष गजानन पवार चिखली तालुका अध्यक्ष गजानन वायाळ युवक काँग्रेस अध्यक्ष कृष्णा मिसाळ महिला तालुका अध्यक्ष सौ रेखाताई महाजन यांनी केले आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या