💥शिवसेना महिला आघाडीच्या वतीने २० ते २२ ऑक्टोबर संघटनात्मक बैठकांचे आयोजन....!


💥शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी कळविले आहे💥

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद 18 ऑक्टोबर

शिवसेना महिला आघाडी पक्ष संघटन मजबुतीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून संभाजीनगरात शिवसेना महिला आघाडीच्या संघटनात्मक बैठकांचे आयोजन दिनांक २० ते २२ ऑक्टोबर २०२१ या काळात होणार असल्याचे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांनी कळविले आहे.

या बैठका दिनांक २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता फुलंब्री ,१२:०० वाजता संभाजीनगर मध्य,  दु. १:०० वाजता संभाजीनगर पश्चिम ,दुपारी २:०० वाजता संभाजीनगर पूर्व शहरात बैठका होणार आहे त्याचप्रमाणे दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:०० वाजता गंगापूर, दू.१:०० वाजता वैजापूर, ३:०० वाजता संभाजीनगर पश्चिम ग्रामीण, त्याचप्रमाणे २२ऑक्टोबर रोजी सकाळी ११:००  वाजता रत्नपुर, दुपारी १:०० वाजता कन्नड याठिकाणी बैठका होणार आहेत.

 शिवसेना नेते पालकमंत्री मा.सुभाष देसाई , मा. चंद्रकांत खैरे , संपर्कप्रमुख मा.विनोद घोसाळकर, मा मंत्री महोदय संदीपान भुमरे , मंत्री मा. अब्दुल सत्तार , शिवसेना उपनेत्या मीनाताई कांबळे विशाखाताई राऊत ,महिला आघाडी संपर्क संघटिका डॉ. मानिषाताई कायंदे, शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे,आमदार प्रदीप जैस्वाल, आ.संजय शिरसाट , आ.रमेश बोरणारे , आ.उदयसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून या या बैठकांमध्ये महिला आघाडी उपशहर संघटक, विभागसंघटक, शाखासंघटक, उपशाखा संघटक ,जिल्हा परिषद सदस्या, पंचायत समिती सदस्या, नगरसेविका, महिला सरपंच, महिला आघाडीच्या आजी-माजी पदाधिकारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटिका सुनीता आऊलवार ,जिल्हा सहसंपर्क संघटिका सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभाताई जगताप, जिल्हा समन्वयक कला ओझा, उपजिल्हा संघटक हर्षली मुट्ठे, लता पगारे, सुलभा भोपळे, साखराबाई तोगे ,अनिता मंत्री, अंजली मांडवकर,दुर्गा भाटी, मीना फसाटे, जयश्री लुंगारे ,तालुका संघटक दिपाली मोहिते ,वर्षा जाधव ,मंगला कापरे ,अर्चना सोमासे, शशिकला बारगळ, जयश्री घाडगे, शहर संघटक प्राजक्ता राजपूत ,आशा दातार ,विद्या अग्निहोत्री विधानसभा संघटक नलिनी महाजन ,मीरा देशपांडे ,लक्ष्मी नरहिरे यांनी केले आहे...             

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या