💥वाशिम येथील महिला व बालविकास अधिकारी कु.प्रियंका गवळी यांची शाळा बाह्य मुलांना अनोखी भेट....!


💥पालवरच्या शाळा बाह्य मुलांना दिली कडाक्याच्या थंडीत मायेची ऊब💥



(फुलचंद भगत)

वाशिम:-भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कर्तव्य पलीकडे जाऊन ज्ञानदानाचे पवित्र काम पोलिस दलातील कार्यरत असणाऱ्या संगीता ढोले ह्या करत आहेत, त्यांच्या सामाजिक कार्याची विशेष दखल घेऊन आज कर्तव्यदक्ष व समाज कार्यात अग्रेसर असणाऱ्या  वाशिम येथील  महिला व बालविकास अधिकारी कु. प्रियंका गवळी यांनी आज 28 आक्टोम्बर रोजी आपला  वाढदिवस अत्यंत समान उपयुक्त पद्धतीने या पालवरच्या शाळा बाह्य मुलासोबत साजरा करून आपल्या वाढदिवसावर अनाढाई खर्च न करता या मुलांना कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे म्हणून उबदार स्वेटर व टोप्या देऊन त्यांना कडाक्याच्या थंडीत मायेची ऊब दिली व आपला वाढदिवस सार्थक केला. त्यांच्या या सामाजिक कार्याची इतरांनी सुद्धा दखल घ्यावी असे आवाहन यावेळी कु.प्रियंका गवळी यांनी केले आहे. आपण या  शाळा बाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठी त्या सतत प्रयत्न करणार आहोत असे यावेळी सांगितले. कु.प्रियंका गवळी यांच्या मदती मुळे पालावरच्या  मुलांच्या चेहऱ्यावर हास्य दिसून येत आहे.यावेळी त्यांच्या समवेत डॉ.मंजुश्री जांमरूणकर,संगीता ढोले उपस्थित होत्या.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या