💥जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - दिवसभराच्या महत्वाच्या बातम्या....!

 


💥दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या तडाख्यात कोण सापडणार ? शिवसैनिकांसह राज्यातील जनतेलाही उत्सुकता💥 

 ✍️ मोहन चौकेकर 

● महाराष्ट्राची कन्या दिव्या देशमुख भारताची नवीन महिला ग्रँडमास्टर; नागपूरची 15 वर्षीय दिव्या बनली देशाची 21 वी महिला ग्रँडमास्टर.

● पुण्यातील जिल्हा परिषद शाळेत चक्क रोबोटीक शिक्षण; नागनाथ विभुते सरांमुळं विद्यार्थ्यांचा इंजिनियरिंगचा पाया होतोय भक्कम.

● आर्यन खानचा तुरुंगातला मुक्काम आणखी 6 दिवस वाढला, ड्रग्ज पार्टीप्रकरणी सुनावणी पूर्ण; 20 ऑक्टोबरला जामीनावर फैसला.

● NCB ला तंबाखू आणि गांजामध्ये फरक कळत नाही; लोकांना बदनाम करण्याचं काम सुरु असल्याचा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा आरोप.

● माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ED विरोधातील याचिकेवर सुनावणी पूर्ण; हायकोर्टाने राखून ठेवला निकाल.

● दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंच्या तडाख्यात कोण सापडणार ? उद्याच्या दसरा मेळाव्याच्या भाषणाची शिवसैनिकांमध्ये उत्सुकता.

● पुन्हा एकदा वाढला देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांचा आकडा; 24 तासांत 18,987 रुग्णांची नोंद....  

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या