💥पुर्णेतील प्रभाग क्रमांक सात मधील इतर भागातील स्थलांतरीत मयतांची नावे तात्काळ वगळण्यात यावी.....!


💥सामाजिक कार्यकर्ते तथा भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव यांची निवेदनाद्वारे मागणी💥

पूर्णा (दि.२८ आक्टोंबर) - पुर्णा नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  तोंडावर प्रशासनाने मतदार याद्यांमध्ये नांव नोंदणी कार्यक्रम सुरू केला असून, येथिल प्रभाग क्र.०७ परिसरातील यादी भाग क्रमांक २०३ मध्ये आजी माजी भावी उमेदवारांकडून बनावट कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन पद्धतीने बोगस मतदाररांची नावे यादीत नावे समाविष्ट करण्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले असतांनाच शहरातील विविध भागातील मतदार याद्यांमध्ये अनेक परगावी असलेले मतदार तसेच मयत झालेले असंख्य मतदारांची नावे बिएलओं यांनी वारंवार याद्या करून वगण्याच्या लेखी स्वरूपात सुचना दिल्यानंतर ही तहसिल प्रशासनाने वगळली नसल्यामुळे तहसिल प्रशासनाच्या या निश्क्रियतेचा गैरफायदा प्रस्थापित उमेदवारांना होत असल्यामुळे मतदार याद्यांतील मयत व बाहेरगावी गेलेले मतदार तसेच प्रभागांतून अन्य प्रभागांमध्ये स्थायिक झालेल्या मतदारांची नावे तात्काळ वगळण्यात यावी अशी मागणी भारतीय भटके विमुक्त विकास संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव यांनी जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल तसेच पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्याकडे लेखी स्वरूपात निवेदन देऊन केली आहे. असल्याची तक्रार  महाराष्ट्र भटक्या विमुक्त संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष सुनिल जाधव यांनी तहसीलदार पुर्णा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पूर्णा शहरातील अनेक प्रभागातील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे.आगामी निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाकडून मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण कार्यक्रम सुरू आहे.प्रभाग क्र.७ मधील यादी भाग क्र. २०१, २०२ आणि २०३ मध्ये काही ईच्छुक उमेदवार बोगस नावाची नोंदणी करत असल्याची तक्रार जाधव यांनी काही दिवसांपूर्वी पूर्णा तहसीलदारां कडे केली होती.त्यांनी आता जिल्हाधिकारी आंचल गोयल यांना याबाबत तक्रार देत प्रभाग क्र.७ मध्ये मागील काही वर्षांपासून  वरील भागात शासकीय सेवेतून सेवानिवृत झाल्यानंतर  इतर राज्यात आपल्या गावी स्थलांतरित झालेल्या लोकांची नावे  तसेच या प्रभागात सुमारे १८ व्यक्ती मयत आहेत.तर १७५ जणांची नावे डबल आलेली आहेत.समाविष्ट असलेली या नावांचा  प्रभागातील  काही राजकीय पुढारी प्रत्येक निवडणुकीत गैरफायदा उचलत आहेत.त्यामुळे या भागातील बि.एल.ओ ना सदरील मतदारांची नावे स्थळ चौकशी करून कमी करण्यासाठी आदेशीत करावे अशी मागणी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष सुनील जाधव यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.....

       

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या