💥मानसिक आरोग्य तानतणाव व्यवस्थापन ऑनलाईन कार्यक्रम संपन्न...!


💥कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ.रवि अवचार यांची उपस्थिती होती💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम: जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने 10 ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य तानतणाव व्यवस्थापन या विषयावर ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून मानसोपचार तज्ञ डॉ. रवि अवचार यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्या. संजय शिंदे यांनी केले. प्रास्ताविकातून बोलतांना न्या. शिंदे म्हणाले, बदलत्या जीवनशैलीमुळे आज प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या तणावाला तोंड दयावे लागत आहे. छोटयांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत प्रत्येक जण आज तणावाखाली असल्याचे त्यांनी सांगीतले.

प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना डॉ. अवचार म्हणाले, तणाव हा दोन प्रकारचा असतो. दैनंदिन काम करतांना थोडा ताण असला म्हणजे माणूस काम गांभीर्याने करतो. परंतू तोच ताण थोडा जास्त वाढला की, त्यामुळे आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो. तानतणावाचे व्यवस्थापन करतांना आपल्याला ज्या गोष्टीची भिती वाटते त्या टाळाव्यात. तसेच त्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्या परिस्थीतीनुसार कशाप्रकारे जुळवून घेता येईल याबाबत विचार करावा असे ते म्हणाले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या