💥उत्साहात शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे स्वागत करूया - उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे


💥येथील बी रघुनाथ सभागृहात आयोजित बैठकीस मुख्याध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद💥

परभणी (दि.01आक्टोंबर) - गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत.विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क नाही.आता 04 ओक्टॉबर पासून शहरी भागात 8 वी ते 12 वी च्या शाळा सुरू होत असून सर्वांनी उत्साहात शाळा सुरू करून विद्यार्थ्यांचे स्वागत करूया असे आवाहन माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले.

येथील बी रघुनाथ सभागृहात जिल्ह्यातील माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.यावेळी विठ्ठल भुसारे,विस्तार अधिकारी गणराज येरमळ, जिल्हा शिक्षण संवर्धन मंडळाचे अध्यक्ष मुख्याध्यापक राजू शिंदे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष देविदास उमाटे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.या बैठकीत शाळा सुरू करणे,कोरोना पार्शवभूमीवर शाळांनी घ्यावयाची काळजी,संचमान्यतेत कार्यरत पदांची माहिती भरणे,सरल प्रणालीत विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करणे,इंस्पायर अवार्ड साठी विद्यार्थ्यांचे नामांकन भरणे,एनएमएमएस शिष्यवृत्तीपात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन माहिती भरणे आदींबाबत भुसारे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी बोलतांना भुसारे म्हणाले की,मुख्याध्यापक हे सर्वांचे समन्वयक असतात.त्यांनी शाळांच्या,शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे.तसेच शाळा सुरू करताना कोरोना बाबत जे मार्गदर्शक तत्वे आहेत त्यांचे पालन करावे.विद्यार्थ्यांना शाळेत येण्याची सक्ती करू नका परंतु त्यांच्यात जागृती करून विद्यार्थी आपुलकीने शाळेत येईल यासाठी  प्रयत्न करणे गरजेचे आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.तसेच इतक्या महिन्यांपासून शाळा बंद असल्याने जी पठारावस्था आलेली आहे ती झटकून अध्यापनाच्या कार्याला उत्साहात लागणेही आवश्यक आहे.शाळेतील शिक्षक तर काम करतीलच पण शाळांच्या पालकांनी व परिसरातील नागरिकांनी देखील शाळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन देखील उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांनी केले.

यावेळी विस्तार अधिकारी गणराज येरमळ, मुख्याध्यापक राजू शिंदे,देविदास उमाटे आदींनी देखील मनोगत व्यक्त करून जिल्हाभरातील शाळा उत्साहात सुरू करू असे आश्वासन दिले.विशेष म्हणजे या बैठकीला मोठ्या प्रमाणावर मुख्याध्यापक उपस्थित राहिल्याने सर्वांनाच आता शाळा सुरू होण्याची आवश्यकता व उत्साह असल्याचे दिसून आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या