💥महात्मा गांधी जयंती निमित्त पारधी गुड्यावर प्रबोधन व ४० कुटुंबांना रेशनची मदत....!


💥कोरो इंडियाच्या मदतीने पाथ फाऊंडेशन चा उपक्रम💥

✍🏻फुलचंद भगत

वाशिम:-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निम्मित पाथ फाऊंडेशन व कोरो इंडिया ने मंगरूळपीर येथील भटक्या विमुक्त, पारधी समाजाच्या पालावर (राहुटी) जाऊन प्रबोधन व खाद्यपदार्थांच्या किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. 


             महात्मा गांधी असे म्हणायचे की, शेवटचा माणूस बघता आला पाहिजे, त्याच्यापर्यंत पोहचता आलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने या वर्षीची गांधी जयंती ही मंगरुळपीर नगरीमधील शेवटच्या लोकांबरोबर साजरी करण्याचा पाथ फाऊंडेशन चा मानस होता व त्यामुळेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमा साठी प्रमुख उपस्थिती म्हणून अॅड. बेलोकर, अॅड. बी. एम. ठाकरे, अॅड. प्रकाश इंगोले, तुळजापूरे,नितीन गावंडे,धार्मिक महाकाळ,अंकुश बेलोकार, श्रीहरी इंगोले उपस्थित होते.


ऊपस्थित प्रमुख पाहुण्यांनी या समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय प्रश्र्नच अधोरेखितच केले नाही तर हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या मुला बाळांना शिकवणे किती गरजेचे आहे. हे सुध्धा सांगितले. या कार्यक्रमाचे आयोजन पाथ फाऊंडेशनचे अॅड. वैष्णव इंगोले, शुभम पवार, सुमेध पजई, जयंत सोनोने, सूचित देशमुख, विवेक व्यास, अक्षय ठाकरे, विहंग ठाकरे, मुकेश चव्हाण व यज्ञेश इंगोले यांनी केले होते. आज या लोकांमध्ये फक्त अन्नाची किंवा पैशांचीच कमतरता नाही तर आपलं आयुष्य  प्रतिष्ठापूरक बनवण्याच्या साध्या विचारांची सुध्दा कमतरता आहे. आणि त्यामुळेच ही संवाद प्रक्रिया थोड्या प्रमाणावर का होई ना ती सुरू करण्याच्या उद्देशानेच हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता असे मत अॅड. वैष्णव इंगोले यांनी व्यक्त केले.


प्रतिनिधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या