💥शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती द्यावी ; कृषी विभागाचे आवाहन...!


💥प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१-२२💥

✍🏻फुलचंद भगत

वाशीम:-जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०२१-२२ या वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रिलायन्स इन्शुरन्स कंपनीची अंमलबजावणी कंपनी म्हणून निवड करण्यात आली आहे. या वर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील २ लाख ४३ हजार शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झाले आहे.  

      जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात आलेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन, तूर, उडीद व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान अंतर्गत एकूण१७ हजार ९२१ शेतकऱ्यांचे विमा पोर्टलवर नुकसानीबाबतची नोंदणी करण्यात आली आहे. काढणी पश्‍चात नुकसान या बाबी अंतर्गत एकूण ६५ हजार ६३८ शेतकऱ्यांनी विमा पोर्टलवर नुकसान झाल्याची नोंद केली असून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहे.

         सप्टेंबर महिन्यात आलेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची नोंदणी शेतकऱ्यांनी विमा पोर्टलवर तसेच टोल फ्री क्रमांक १८००१०२४०८८ यावर करावी. क्षेत्रीय पातळीवर कृषी सहाय्यक/ कृषी पर्यवेक्षक/ मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांचे मार्फत गावपातळीवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. सर्व विमाधारक नुकसानग्रस्त सर्व शेतकरी बांधवांनी नुकसानीची माहिती वेळेत ऑनलाईन किंवा ऑफलाईन दयावी.

       जिल्ह्यातील रिलायन्स इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी, त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक व कार्यालयाचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. वाशिम जिल्हा कार्यालयाचे प्रतिनिधी श्री सोमेश देशमुख (८८८८१८३९०८), जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय वाशिम. वाशिम तालुका प्रतिनिधी - श्री नितीन घुगे (८९९९९४८२१२), महाजन कॉम्प्लेक्स, शिवाजीनगर, काटा रोड वाशिम. रिसोड तालुका प्रतिनिधी - निलेश गरड (९५४५४२५८७०) खंडेलवाल कॉम्प्लेक्स, वाशिम नाका, रिसोड. मालेगाव तालुका प्रतिनिधी - अविनाश जगताप (९३२२२१९०९१) गोयंकानगर,बँक ऑफ महाराष्ट्रजवळ मालेगाव.मंगरुळपीर तालुका प्रतिनिधी - अर्जुन पवार (७०३८७००४४९) बायपास रोड, स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंटसमोर मंगरूळपीर. मानोरा तालुका प्रतिनिधी - भूषण लाहे (७७७६९४९९८१) सेवादासनगर, नाईक कॉलनी, स्टेट बँकेच्या मागे मानोरा.आणि कारंजा तालुका प्रतिनिधी - मंगेश घुले (९८६०७०६५०६) दुकान क्रमांक 1, दत्त कॉलनी, वेदांत पब्लिक स्कूल जवळ कारंजा.

     ज्या शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची ऑनलाइन तक्रार नोंदविली आहे,अशा शेतकऱ्यांनी ऑफलाइन तक्रार देण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी नुकसानीबाबतची माहिती तालुका पातळीवर विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधी व क्षेत्रस्तरावर कृषी सहाय्यक/ कृषी पर्यवेक्षक/ मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी वाशिम यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या