💥पुर्णेत राज्यव्यापी लिंगायत महामोर्चा जनजागृती यात्रेचे जल्लोशात स्वागत...!


💥परभणी जिल्हाधिकारी कार्यावर रविवार दि.२४ आक्टोंबर रोजी आयोजित लिंगायत महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन💥


पूर्णा/प्रतिनिधी

लिंगायत समाज बांधवांच्या विवीध मागण्यासाठी परभणी जिल्ह्याकचेरीवर २४ ऑक्टोबर रोजी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे काढण्यात येणार आहे. समाजातील प्रत्येकाने घटकाने या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प.पु.जगदगुरु चन्नबसवानंद महास्वामीजी यांनी केले आहे.


           परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर रविवार( दि. २४) ऑक्टोबर रोजी लिंगायत समाज बांधवांच्या महामोर्चा धडकणार आहे.यासाठी  प.पु.जगदगुरु चन्नबसवानंद महास्वामीजीं यांच्या नेतृत्वाखाली प.पु.जगदगुरु बसवकुमार स्वामीजी, प.पु.बसवलींग स्वामीजी,प.पु अनिमीषानंद स्वामीजी हे  जिल्हाभर आवहान यात्रेद्वारे समाज बांधवांशी संवाद साधत आहेत.

 पुर्णेत आज शुक्रवार दि.२२ आक्टोंबर २०२१ रोजी सकाळी १०-०० वाजण्याच्या सुमारास त्यांनी महास्वामींच्या आवहान यात्राचे आगमन झाले.यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.. लिंगायत धर्मास स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, उपेक्षित लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासाठी समाजाच्या वतीने वेळोवेळी शासनास  निवेदने दिली. विविध आंदोलने केली. मात्र शासन समाजाच्या या आग्रही मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याने सरकारला जागे करण्यासाठी समाजाच्या वतीने रविवारी परभणी येथे महामोर्चाचे आयोजन केले आहे.या महामोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांच्या समवेत लिंगायत संघर्ष समीतीचे समन्वय अॅड.अविनाश भोसीकर,जि.प.सदस्य प्रभुअप्पा वाघीकर,किर्ती कुमार बुरांडे, डॉ.कु-हाडे, औरंगाबाद महापालीका सदस्य प्रदिप बुरांडे, डॉ.मोरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.ही आवहान यात्रा पुर्णा शहरात येताच प्रारंभी झिरोटीपाईन्ट येथे शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, यांनी उपस्थित मान्यवर पाहुण्यांचे शालश्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे, मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के, नगरसेवक श्याम कदम,शंकर गलांडे,गजानन हिवरे, बसव ब्रिगेडचे शिवाजी भालेराव,रमेश एकलारे,अँड. अमोल पळसकर,गजानन क्यातमवार,गोविंद पळसकर, नागनाथ भालेराव,महेश कापसे, अँड.एस. के. पळसकर,रत्नाकर सुर्यवंशी,बाबा सोनटक्के, केदार पाथरकर, श्रीनिवास तेजबंद आदीं उपस्थित होते.यानंतर बसस्थानक, आनंद नगर कॉर्नर, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा बसवेश्वर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौकातुन ही आवहान यात्रा करण्यात आली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या