💥पुर्णेतील शासकीय ग्रामीण रुग्णालयात महात्मा गांधी जयंती व तंबाखू विरोधी दिना निमित्त कर्मचाऱ्यांनी घेतली शपथ...!


💥गुटखा तंबाखूजन्य पदार्थ्याचे सेवन न करण्याचा शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा शपथ घेऊन निर्धार💥 

पूर्णा (दि.०२ आक्टोंबर) - येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात आज शनिवार दि.०२ आक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास महात्मा गांधी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी गांधी जयंती व तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून शासकीय ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गुटखा तंबाखूजन्य पदार्थ सेवन न करण्याची शपथ घेतली.

 यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.हरिभाऊ जी.गाडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिंदे,डॉक्टर नदीम ,एन .सी .डी समुपदेशक आकाश डोंगरे,स्टाफ नर्स कर्मचारी कृष्णा चापके आदी कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या