💥वाशिम जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कु.प्रियंका गवळी यांना विदर्भभुषण पुरस्कार जाहीर...!


💥डॉ.बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेकडून विदर्भभुषण पुरस्काराची घोषणा💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणार्‍या वाशिमच् जिल्ह्याच्या महिला व बालविकास अधिकारी यांना यंदाचा विदर्भभुषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

                डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्था तोंडगाव ता. जि वाशिम यांच्या वतीने सामाजिक जाणिवेतून निस्वार्थी सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे. या वर्षीचा विदर्भ भुषण पुरस्कार (२०२१-२२) प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी कु.प्रियांका हरीश्चंद्र गवळी (जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वाशिम याना विदर्भ भुषण पुरस्काराने दि. २८/१०/२०२१ रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.कोरोणाकाळात प्रशासनात राहुन प्रेरणादायी कार्य तसेच सामाजिक दायित्वाची जाण ठेवुन तळागाळातील लोकांसाठी सदैव झटुन अनेकांना कोरोणाकाळात मदतीचा हात देवुन लोकहिताचे ऊपक्रम राबवले.कोविड-१९ चा सामना करण्यासाठी फ्रंटलाईनवर काम करुन लसिकरणासाठी पुढाकार घेतला.लोकांना कोरोना प्रतिबंधक लसिकरनाचे महत्व पटवुन देवुन लसिकरण आकडेवारी वाढवण्यासाठी महत्वपुर्ण योगदान दिले.कुपोषणाचे वाशिम जिल्ह्यातुन ऊच्चाटन करण्यासाठी प्रशासकीय योगदानाची भुमिका पार पाडुन कुपोषणमुक्तीसाठी कार्य केले.बेटी बचाओ,बेटी पढावो करीता धडाडीचे काम करुन मुलींच्या साक्षरतेविषयी जनजागृती केली.मुलीलाही समाजात समान भुमिका मिळावी यासाठी ऊल्लेखनिय कार्य केले.मुलीचा जन्मदर वाढावा यासाठी मोलाची कामगीरीही केली.या सर्व कार्याची दखल घेवुन कु.प्रियंका गवळी यांना मिळत असलेल्या पुरस्कारामुळे सर्वच स्तरातुन त्यांचे कौतुक होत असुन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या