💥पूर्णा तालुक्यात गाढवाच्या नावाखाली रेती चोर दिड शहाण्यांचा धुमाकूळ ; पुर्णा-गोदावरी नद्यांचे पात्र खरडण्याचा उद्देश मुळ...


💥शहरासह शेतशिवारात गोंधळ तर नदीपात्रात रेती तस्कर मालकांना मुजरा ; प्रशासनातील भ्रष्ट कारभारी मात्र हुजरा💥


पुर्णा ; तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील गौण-खनिज अर्थात रेतीचे अवैध उत्खनन व चोरटी वाहतूक म्हणजेच तस्करी करण्यासाठी रेती तस्करांकडून पुर्वी 'ट्रेक्टर-टिप्पर-हायवा' आदी वाहनांचा वापर केला जात होता परंतु जड वाहनांतून होणाऱ्या रेती तस्करीकडे प्रशासनासह पोलिस प्रशासनाची वक्रदृष्टी तात्काळ पोहोचून अव्वाच्या सव्वा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागत असल्यामुळे रेती तस्करीला प्रोत्साहन देणाऱ्या महसुल प्रशासनातील झारीतल्या शुक्राचार्यांच्या सल्ल्यानुसार रेती तस्कर दिड शहाण्यांनी ट्रेक्टर-टिप्पर-हायवा' आदी वाहनांना बायबाय करीत असख्य गाढवांच्या टोळ्या तयार करीत या गाढवांच्या टोळ्याचे नेतृत्व करीत तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नद्यांवर टोळधाडी टाकण्यास सुरूवात केल्याचे सर्वत्र निदर्शनास येत असून भल्या पहाटे शहरासह संपूर्ण तालुक्यात मोकळी सोडलेली असंख्य गाढव एकत्रित करून त्या गाढवांच्या साहाय्याने रेती वाहतूक व विक्री करायची आणि नंतर मात्र त्या गाढवांना 'काम सरो वैद्य मरो' या नितीचा अवलंब करीत मोकाट चरण्यास सोडून द्यायचे असा दिड शहाणपणाचा उद्योग आरंभल्याने ही मोकाट गाढव शहरात एकमेकांच्या मागे धावत धुमाकूळ घालतांना पाहावयास मिळत आहे.


या गाढवांच्या गोंधळामुळे सर्वसामान्य नागरिकांना सर्वत्र जिव मुठ्ठीत घेऊन फिरावे लागत आहे तर रात्रीच्या वेळी याच असंख्य गाढवांच्या टोळ्या परिसरातील शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर तुटून पडत असल्यामुळे शेतकरी अक्षरशः त्रस्त झाले आहेत तालुक्यात रेती तस्करीचा गोरख धंदा चालवण्यासाठी सातत्याने गाढवांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असून त्यासाठी गाढवांचा रेती तस्करीसाठी वापर करणाऱ्यांकडून प्रति गाढव पाचशे रुपयांचा हप्ता भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना घरपोच दिल्या जात असल्याचे रेती तस्करांकडून बोलले जात आहे शहरात गाढवांनी अक्षरशः उच्छाद मांडला असुन गाढवांच्या सुळसुळाटामुळे शासकीय कार्यालयासह येथील नागरिकही हतबल झाले आहेत.


पुर्णा शहर व तालुक्यात पुर्णा-गोदावरी नदीपात्रांतून बेकायदेशीरपणे चोरट्या पध्दतीने रेतीचे उत्खनन करून या चोरट्या रेती तस्करीला अक्षरशः सोन्याचे दिवस आले आहे.या गोरखधंद्याला पोलीस आणी महसूल अधिकाऱ्यांची खुली सुट मिळत असल्याचे रेती तस्करांची हिंमत कमालीची वाढल्याचे दिसत आहे.मागील काही महिन्यांपुर्वी  जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक श्री.जयंत मीना यांच्या विशेष पथकाने रेती तस्करांच्या विरोधात जोरदार कारवाया करीत रेती तस्करांना सळो की पळो करून सोडले होते त्यांच्या विशेष पथकाचे तत्कालीन अधिकारी चंद्रकांत पवार यांनी जंगजंग पछाडत अनेक रेती माफीयांचे अक्षरशः आर्थिक कंबरडे मोडले.यामुळे अवैध धंदे बंद झाल्याने रेती माफीयांचे मोठं नुकसान होत असल्याने रेती माफीयांनी अनोख्या युक्तीचा वापर करीत रेती तस्करीसाठी जड वाहनांचा वापर न करता असंख्य गाढव खरेदी करून गाढवांच्या साह्याने अवैध रेती उपसा करण्याचे काम पुन्हा एकदा युध्द पातळीवर सुरू केले. माफीयांनी यासाठी सुमारे ४००-५०० गाढवे खरेदी करुन त्यांना रेती उपसा करण्यासाठी जुंपले.या गोरखधंद्यात अडकाठी नको म्हणून स्थानिक पोलीस व महसूल अधिकाऱ्यांशी तोंडी छुपा आर्थिक करार ही केल्याचे बोलले जाते प्रति गाढवांसाठी गाढव मालकास पाचशे रुपये हप्ता द्यावा लागत असल्याची जोरदार चर्चा गाढवांप्रमाणेच शहरासह तालुक्यात जनसामान्यांच्या कानात धुमाकूळ घालत आहे.त्यामुळे अवैध रेती उपस्यासह रेती तस्करीचा गोरखधंदा राजरोसपणे सर्वत्र सुरु झाला आहे.

    शहरात अवैध रेती उपसा व रेती तस्करी करण्यासाठी रेती माफीयांनी गाढवांची मोठी फौजाच तैनात केल्या असून अवैध रेती उपस्याचे काम संपल्यानंतर ही मोकाट गाढव शहरातील एटीएम,रेल्वे स्थानक बसस्थानक,व्याजारपेठेतील दुकानांना आपली आश्रयस्थान  बनवत आहेत.रात्रभर उभे राहुन घाण पसरवत आहेत.तसेच पुर्णा शहरालगत असलेल्या शेत शिवारातील उभी पिकं मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त करुन शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहेत.या मोकाट गाढवांचा बंदोबस्त करण्यासाठी पालीकेची यंत्रणा ही सुस्तावलेली दिसुन आहे.आता रेती माफीयांनी रेती तस्करी साठी गाढवाच्या साह्याने लढविलेली शक्कल मोडुन काढण्यासाठी पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी काय भुमिका घेतात हे पाहणं औचित्याचे ठरणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या