💥परभणीचे खासदार संजय जाधव यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी..!


💥पुर्णा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीत शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान खा.जाधव यांनी केली प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी💥 

  पुर्णा (दि.१ आक्टोंबर) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या खरीफ हंगामातील सोयाबीन,उडीद,कापूस आदीसह हळद उस फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवल्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला असून आज शुक्रवार दि.०१ आक्टोंबर रोजी परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय शिवसेना खासदार श्री संजय जाधव यांनी तालुक्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना आधार दिला आणी संबधित यंत्रनेस नुकसान भरपाई,पंचनामे संदर्भात सुचना केल्या या वेळी शेतकऱ्यांशी बोलतांना खा.जाधव म्हणाले की या गंभीर परिस्थितीत हार मानू नका मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असेही ते म्हणाले यावेळी खासदार जाधव यांच्या सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम,शिवसेना उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले,शिवसेना तालुका प्रमुख काशिनाथ काळबांडे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते...यांनी पुर्णा तालुक्यातिल अतिवर्ष्टी ने बाधित झालेल्या शेतशिवाराची प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानिची पहाणी केली...🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या