💥नांदेड येथील प्रसिध्द विधिज्ञ ॲड.अशोकराव माधवराव नेरलीकर यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन...!


💥पुर्णा येथील रहिवासी असलेले ॲड.अशोकराव नेरलीकर हे माजी आमदार स्व.माधवराव नेरलीकर यांचे सुपुत्र होते💥

पूर्णा, प्रतिनिधी/

नांदेड ; पूर्णेचे रहिवासी तथा नांदेड चे प्रसिद्ध विधिज्ञ ॲड.अशोकराव माधवराव नेरलीकर यांचे दीर्घ आजाराने काल शनिवार दि.२३ ऑक्टोंबर २०२१ रोजी निधन झाले मृत्युसमयी त्यांचे वय 69 वर्ष होते त्यांच्या मागे पत्नी,मुलगा, मुलगी असा परिवार आहे. 

माजी आमदार माधवराव नेर्लीकर यांचे चिरंजीव हायकोर्टाचे न्यायाधीश महेंद्र नेरलीकर, मुंबई येथील न्यायाधीश राजेश नेरलीकर,पूर्णा रिपब्लिकन सेनेचे आनंद नेरलीकर, संस्थाचालक गौतम नेरलीकर यांचे ते भाऊ होत.

त्यांच्या पार्थिवावर नांदेड येथे आज रविवार दि.२४ ऑक्टोंबर रोजी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या