💥राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदावर सुभाषराव राठोड यांची नियुक्ती...!


💥राष्ट्रीय अध्यक्ष किसनराव राठोड यांनी नियुक्तीपत्र देऊन केली महाराष्ट्र राज्य संघटक पदावर नियुक्ती💥 

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत राहून अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून प्रदिर्घ सेवा बजावल्यानंतर नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्री सुभाषराव सुंदरसिंघ राठोड यांची राष्ट्रीय बंजारा परिषद या सामाजिक संघटनेच्या महाराष्ट्र राज्य संघटक पदावर राष्ट्रीय अध्यक्ष श्री.किसनराव राठोड यांनी नियुक्तीपत्राद्वारे नियुक्ती केली आहे.


राष्ट्रीय बंजारा परिषदेने सुभाषराव राठोड यांना दिलेल्या नियुक्ती पत्रात असे नमूद केले आहे की आपण आपले बुध्दी कौशल्य लोकशाही मार्गाने कायद्याच्या माध्यमातून सामाजिक जनहीत जोपासून संघटनेचे नाव उज्वल कराल ही अपेक्षा...पुढे नियुक्ती पत्रात असे ही नमूद केले आहे की आपण गोर बंजारा समाजाला केंद्र बिंदू समजून त्यांच्या न्याय हक्क अधिकार मान सन्मान सोबत परिस्थितीनुसार उद्भवणाऱ्या समस्यांसाठी सतत कार्यरत राहावे.आपण करीत असलेल्या कार्याचा अहवाल आपल्या जिल्हा/विभागीय/राज्य/राष्ट्रीय प्रमुख यांना प्रत्येक महिण्याला लेखी स्वरूपात कळवण्यात यावा.गोर बंजारा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक धार्मिक आर्थिक व सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहून राष्ट्रीय बंजारा परिषद ही संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे असेही नियुक्ती पत्रात म्हटले असून त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे शहिद सरदार उधमसिंघ फाऊंडेशन महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चौधरी दिनेश,भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटना महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष प्रा.सुधीर अनवले,प्रदेश उपाध्यक्ष मा.नगरसेवक सुनिल जाधव रिपाईचे जेष्ठ नेते प्रकाशदादा कांबळे,पुर्णा नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांचे प्रतिनिधी तथा मा.नगरसेवक संतोष एकलारे,उपनगराध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा प्रमुख विशाल कदम,नांदेड येथील जेष्ट पत्रकार सरदार रविंदरसिंघ मोदी,भाजपा नेते तथा नगरसेवक सरदार दिलीपसिंघ सोडी पत्रकार सुरेश काशिदे यांनी अभिनंदन केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या