💥गावातील शेतकऱ्यांना जलसिंचन विहीर अनुदानापोटी २५ लाख रूपयाच्या चेकचे वाटप...!


💥नंदागौळच्या प्रत्येक कुटुंबाचा विकास करणे हेच माझे ध्येय – सुंदरभाऊ गित्ते

💥आतापर्यंत फक्त विहिर अनुदानापोटी गावातील शेतकऱ्यांना ३ कोटी रूपये वाटप💥


💥सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजयजी मुंडेच्या माध्यमातून गावचा कायापालट करणार💥 

परळी(प्रतींनिधी) परळी तालुक्यातील नंदागौळ ग्रामपंचायत मागील ४ वर्षापासून गावचे युवकनेते सुंदरभाऊ गित्ते यांच्या ताब्यात आल्यानंतर गावात जलसिंचन विहिरी,घरकुल,गायगोठा,शौचालय यासह अनेक व्यक्तीगत लाभाच्या योजना देऊन गावचा विकास सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून काल ०३ ऑक्टोबर रोजी विहिरी अनुदानापोटी २५ लाख रुपयांच्या चेकचे वाटप शेतकऱ्यांना केले,यावेळी बोलताना नंदागौळच्या प्रत्येक कुटुंबाचा विकास करणे हेच माझे ध्येय असून ना.धनंजयजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून गावचा कायापालट करणार असल्याचे सुंदरभाऊ गित्ते म्हणाले. 

        याबाबत सविस्तर वृत्त की,परळी तालुक्यातील नंदागौळ ग्रामपंचायतीची  विकासाची घौडदौड युवक नेते सुंदरभाऊ गित्ते यांच्या नेतृत्वात सुरू असून गावाच्या सार्वजनिक विकासाबरोबरच व्यक्तीगत विकासाकडे लक्ष दिल्यामुळे नंदागौळ गावाची वाटचाल एक विकसित गाव म्हणून होताना दिसत आहे,त्याचाच एक भाग म्हणून गावातील शेतकऱ्यांना जलसिंचन विहीर अनुदानापोटी २५ लाख रूपयाच्या चेकचे वाटप केले.आता पर्यंत फक्त जलसिंचन विहिरीच्या अनुदानापोटी ३ कोटी रुपयांचे अनुदान गावातील शेतकर्यांाना मिळाले असून,येत्या काळात गावाला समृद्ध बनवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राज्याचे सामाजिक न्यायमंत्री ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून खेचुन आणून गावचा कायापालट करणार असल्याचे यावेळी बोलताना सुंदरभाऊ म्हणाले.गावातील प्रत्येक कुटुंब स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे,त्या कुटुंबाची प्रगती झाली पाहिजे त्यासाठीच माझी धडपड सुरू असून,गावच्या विकासासाठीच संघर्ष सुरू असून या जनतेच्या आशीर्वादाने नक्कीच येणार्याम काळात एक आदर्श व समृद्ध गाव म्हणून महाराष्ट्राला ओळख झाली पाहिजे असे प्रतिपादन सुंदरभाऊंनी केले.यावेळी गावातील नागरिकांनी सुंदरभाऊचे आभार व्यक्त करत त्यांचा सत्कार केला व येणार्याय प्रत्येक निवडणुकीत भाऊच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या