💥कर्णपुरा देवी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात देण्यात यावा....!


💥आमदार अंबादास दानवे यांची पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मागणी💥                                            

✍️ मोहन चौकेकर

संभाजीनगर / औरंगाबाद 

संभाजीनगर शहराचे ग्रामदैवत कर्णपुरा देवी मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी पालकमंत्री सुभाष देसाई  यांच्याकडे केली आहे.


संभाजीनगर शहरात ४०० वर्ष जुने पुरातन आई तुळजाभवानीचे मंदिर छावणी परिसरातील कर्णपुरा येथे आहे. कर्णपुरा देवी तसेच नवसाला पावणारी देवी म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मंदिराला ऐतिहासिक महत्त्व असून चारशे वर्ष जुनी परंपरा आहे नवरात्रोत्सवात दहा दिवस या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते याकाळात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, नवरात्रीच्या काळात मोठा उत्सव साजरा केला जातो.यामुळे शहराच्या वैभवात भर घालणार्‍या या मंदिरास तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे...

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या